.....यासाठी भाजप करणार 'मुख्यमंत्री भाडे भरा' आंदोलन - BJP to Do agitation for redevelopment of Chawls in Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

.....यासाठी भाजप करणार 'मुख्यमंत्री भाडे भरा' आंदोलन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

जुन्या इमारतीतील आणि चाळीतील रहिवाशांना विकसकांनी वाऱ्यावर सोडले असून सरकारही या रहिवाशांची बाजू घेत नाही. त्यामुळे ३ ते १० ऑक्‍टोबर दरम्यान संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्या जातील, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. या वेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा व खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.

मुंबई : मुंबईत जुन्या इमारतींच्या आणि चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न चिघळला असून हजारो लोक बेघर झाले आहेत आणि त्यांना घरभाडेही मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या वतीने शनिवारपासून 'मुख्यमंत्री भाडे भरा' आंदोलन करणार असल्याची घोषणा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

जुन्या इमारतीतील आणि चाळीतील रहिवाशांना विकसकांनी वाऱ्यावर सोडले असून सरकारही या रहिवाशांची बाजू घेत नाही. त्यामुळे ३ ते १० ऑक्‍टोबर दरम्यान संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्या जातील, असेही दरेकर यांनी सांगितले. या वेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा व खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.

संक्रमण शिबिरांमधील रहिवासी अनेक वर्षे स्वमालकीच्या घराची वाट पाहत आहेत. त्यामुळे म्हाडा वसाहतीत किंवा संक्रमण शिबिरातील रहिवाशांना भाड्यामध्ये ५० टक्के सवलत द्यावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील म्हाडा गृहनिर्माण संस्थांचे अनेक पुनर्विकास प्रकल्प विकासकांनी जाणीवपूर्वक रखडवले असून रहिवाशांची भाडीही बंद केली आहेत. नव्वद टक्के रहिवाशांना भाडे मिळत नाही, यातील बहुतेक लोक गरीब आहेत. त्यामुळे सरकारने अशा विकासकांवर भाडे देण्याची सक्ती करावी; अन्यथा सरकारने रहिवाशांना भाडे द्यावे, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख