Ban on 'TickTalk' will make millions of youth unemployed in India !, Nirupam's strange argument | Sarkarnama

" टीकटॉक' वरील बंदीने भारतातील लाखो तरूण बेरोजगार होतील!, निरूपम यांचे अजब तर्कट 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जून 2020

केंद्र सरकारने चीनी 59 ऍपवर बंदी घातली आहे. यामध्ये लोकप्रिय टीकटॉकचा समावेश आहे. याबाबत निरूपम यांनी व्टिटरच्या माध्यमातून आपली मते मांडली आहेत

मुंबई : अत्यंत स्वस्त, सोपे, शुद्ध असे करमणुकीचे साधन असलेल्या टीक टॉक ऍपवर बंदी घातल्यामुळे देशातील लाखो तरूण बेरोजगार होतील,असे अजब तर्कट कॉंग्रेस पक्षाचे माजी खासदार संजय निरूपम यांनी लढवले आहे. 

नेहमी पक्षाच्या भुमिकेला क्षेद देणारी भुमिका घेऊन वादग्रस्त ठरणारे निरूपम यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रांत चर्चेचा धुरळा उडाला आहे. 

केंद्र सरकारने चीनी 59 ऍपवर बंदी घातली आहे. यामध्ये लोकप्रिय टीकटॉकचा समावेश आहे. याबाबत निरूपम यांनी व्टिटरच्या माध्यमातून आपली मते मांडली आहेत. 

ते म्हणाले की, हा निर्णय योग्य असला तरी टिकटॉकवर बंदी घातल्यामुळे देशातील लाखो तरुण बेरोजगार होतील. मंगळवारी त्यांनी ट्विट करत हे विधान केले आहे. 
निरुपम म्हणाले, "" चिनी ऍप्सवर बंदी आणणे हा योग्य निर्णय आहे. परंतु टिकटॉकवर बंदी आणल्यामुळे आपल्या देशातील लाखो तरुण बेरोजगार होतील. 
या कालावधीतील स्वस्त, शुद्ध आणि घरगुती करमणुकीपासून आपण वंचित राहू. टीकटॉक स्टार्सचा अचानक अंत होणे ही शोकांतिका आहे. त्यांच्या अफाट प्रतिभेला नम्र आदरांजली, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे. त्यांनी हे व्टीट उपरोधीकपणे केले आहे का?अशी शंका घेण्यास कोणताच आधार नाही,असे मानले जाते. 

देशातील 130 कोटी जनतेच्या खाजगी माहिती-डेटा चोरीच्या पार्श्वभूमीवर सरकारने या ऍप्सवर बंदी घातली आहे. आयटी मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अँड्रॉईड व आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या काही मोबाइल ऍप्सचा गैरवापर केल्याच्या अनेक तक्रारी विविध लोकांकडून आल्या आहेत. ही ऍप्स वापरकर्त्यांचा डेटा चोरतात आणि त्यांची गोपनीय माहिती अनधिकृतपणे भारताबाहेर पाठवतात, असेही केंद्राचे म्हणणे आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्रानेही अशा ऍप्सवर व्यापक बंदी घालण्याची शिफारस केली आहे. अलीकडे अशी ऍप्स भारताच्या सार्वभौमत्वासाठी आणि अखंडतेसाठी धोकादायक असल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे भारत सरकारने मोबाइल आणि गैर-मोबाइल इंटरनेट सक्षम उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही ऍप्सना बंद केली आहेत. तसेच त्या ऍप्सचा वापर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख