शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साधेपणाने साजरा करणार - Balasaheb Thackeray Death Anniversary tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साधेपणाने साजरा करणार

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

उद्या मंगळवारी १७ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेन घेतला आहे. शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जमू नये, असा आदेश शिवसेनेने दिला आहे.

मुंबई : उद्या मंगळवारी १७ तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय शिवसेनेन घेतला आहे. शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जमू नये, असा आदेश शिवसेनेने दिला आहे.

शिवसेना भवनात अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबईतील विभाग प्रमुखांना हा आदेश देण्यात आला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन उद्या (मंगळवार) आहे. यावेळी कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही. 

मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि परिवार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. राज्यातली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन विभागातील शिवसैनिक, विभागप्रमुख यांनी शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळी ठिकाणी जमू नये असा आदेश देण्यात आला आहे.  दरम्यान, दिवाळीत खरेदीसाठी वाढलेली गर्दी आणि कोरोनाची वाढलेली रूग्णसंख्या विचारात घेऊन आगामी हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. येत्या ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार होते. मात्र, गेल्या काही दिवसांत दिवाळीच्या खरेदीसाठी सर्वच शहरांमध्ये बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे ही आकडेवारी लक्षात घेऊन सत्ताधारी पक्षाने हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार सुरु केला आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कामकाज सल्लागार समितीची पुन्हा बैठक होणार आहे.या बैठकीत कोरोना आकडेवारीचा विचार करून आधिवेशन घ्यायचे कि पुढे ढकलायचे याबाबत विचार केला जाणार आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख