कोरोना लसीकरणाच्या पहिल्या यादीत ठाण्याचे महापौर, शिवसेनेचे आमदार कसे?  - Ashish Shelar criticizes Shiv Sena over corona vaccination | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या यादीत ठाण्याचे महापौर, शिवसेनेचे आमदार कसे? 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 3 मार्च 2021

मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागात पहिल्या फळीतील यादीत बनावट नावे घुसवून "इंडिया बुल' च्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली.

मुंबई : पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना प्रथम लस देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगतले होते. तरीही ठाण्याचे महापौर, एका शिवसेना आमदारासह वरळीतील "इंडिया बुल'च्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस कशी मिळाली, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी विधानसभेत केला. 

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागात पहिल्या फळीतील यादीत बनावट नावे घुसवून "इंडिया बुल' च्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली. या प्रकरणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश दिला आहे, अशी माहिती राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत दिली. 

सरकारची चार खाती मंत्री वा अधिकारी नाही तर वेगळीच माणसे चालवत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशांत निलांबरी, उद्योग विभाग गिरीश पवार, नगर विकास विभाग अजय आशर, गृहनिर्माण विभाग कीर्तीकुमार केडिया हे चालवत आहेत. या व्यक्ती कोण आहेत? तर उच्च शिक्षण मंत्री यांच्याकडे 15 ते 20 कर्मचारी कर्जाऊ घेण्यात आले आहेत. "एमएमआरडीए'सारख्या महत्त्वाच्या प्राधिकरणावर आर. ए. राजीव यांना कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहे. मग हे सरकार "आपले सरकार' कसे, असा सवाल शेलार यांनी केला. 

जागा मालकांना भरपाई देऊ असे सांगत आहे 

मेट्रोची कारशेड आरेमधून कांजूरमार्गला आणण्याचा हट्ट केला जातोय, पण यात काही जमीन मालकांच्या फायद्यासाठी करीत तर नाही ना? असे आम्ही वारंवार सांगत होतो. नुकतेच न्यायालयात सरकार मालकांना भरपाई देऊ, असे सांगत आहे. हेच आम्ही सांगत होतो, असेही आमदार आशीष शेलार म्हणाले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख