अनिल देशमुखांच्या बंगल्यावर पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु; भातखळकरांचा आरोप - Anil Deshmukh Destroying Proofs in Hundred Crore Allegation Case Allege Atul Bhatkhalkar | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल देशमुखांच्या बंगल्यावर पुरावे नष्ट करण्याचे काम सुरु; भातखळकरांचा आरोप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

अनिल देशमुख यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने तातडीने आवश्यक कारवाई करावी अशी मागणी भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे

मुंबई : मी अत्यंत जबाबदारीने सांगू इच्छितो की नुकताच राजीनामा दिलेले गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या शासकीय निवासस्थान आणि कार्यालयात असलेले 100 कोटीच्या प्रकरणा संदर्भातील पुरावे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने (CBI) तातडीने आवश्यक कारवाई करावी.., असा गंभीर आरोप भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे. Anil Deshmukh Destroying Proofs in Hundred Crore Allegation Case Allege Atul Bhatkhalkar

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआयने (CBI) प्राथमिक चौकशी करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. प

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले याचे आम्ही स्वागत करतो. अनिल देशमुख यांची ताबडतोब मंत्रीमंडळातून हक्कालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे (BJP) नेते अतुल भातखळकर यांनी या निकालानंतर केली होती. Anil Deshmukh Destroying Proofs in Hundred Crore Allegation Case Allege Atul Bhatkhalkar

अनिल देशमुख यांच्या विरोधात परमबीर सिंह यांनी केलेल्या १००कोटीच्या वसुलीच्या आरोपांची गंभीर दखल घेत याप्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. देशमुखांना हटवण्याचे बळ मुख्यमंत्र्यांमध्ये नाही,थोडी तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले होते. त्यानंतर काही वेळातच देशमुख यांनी राजीनामा दिला.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख