मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर उद्या पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. राऊत त्यासाठी आज लिलावती रुग्णालयात दाखल होत आहे. एक वर्षापूर्वी राऊत यांच्यावर याच रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.
राऊत यांना पुन्हा त्रास वाटू लागल्याने परत एकदा अँजिओप्लास्टी करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला होता. लिलावती रुग्णालयात प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डाॅ. मॅथ्यू हे राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी करणार आहेत. त्यासाठी राऊत आज सायंकाळी लिलावती रुग्णालयात दाखल होत आहेत. सुरुवातीला त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाईल व त्यानंतर उद्या दुपारी अँजिओप्लास्टी केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
हे देखिल वाचा -
शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत..शिवसेनेची भाजपवर टीका
'भारतीय जनता पक्षाचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत असते. तसे ते आता एका अजान प्रकरणात फसफसताना दिसत आहे. बाबरीचे ढाचे कोसळताच ज्यांनी बगला वर केल्या त्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून आज भाजपवर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा,' असं मत सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे.
Edited By - Amit Golwalkar

