महाआघाडी सरकारला काँग्रेसने बाहेरूनच पाठिंबा द्यायला हवा....

या सरकारमधले अंतर्गत विरोध मोठे होवू शकतील, त्यामुळे प्रत्यक्ष सरकारमध्ये सामील न होता उध्दव ठाकरे सरकारला बाहेरून पाठिंबा द्या, असे आपण स्व. अहमद पटेल यांना सुचवले होते, अशी माहिती काँग्रेसचे नेते अनंत गाडगीळ यांनी दिली आहे
Ahmed Patel - Anant Gadgil
Ahmed Patel - Anant Gadgil

मुंबई :  या सरकारमधले अंतर्गत विरोध मोठे होवू शकतील, त्यामुळे प्रत्यक्ष सरकारमध्ये सामील न होता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला बाहेरून पाठिंबा द्या, असे आपण स्व.अहमदभाई पटेल यांना तेव्हा सुचवले होते, याचे स्मरण कॉंग्रेस नेते अनंत गाडगीळ यांना होते आहे. सरकारबाबत काय करावे, अशी विचारणा पटेल यांनी केली होती, त्यावेळी मी माझे हे मत व्यक्त केले होते, असे गाडगीळ म्हणाले. (Anant Gadgil Advised Outside support of Congress to Maha Vikas Aghadi)

भाजपला (BJP) सत्तेपासून रोखणे अत्यंत आवश्यक आहे. तशी संधी महाराष्ट्रात उपलब्ध झाली आहे.अशा वेळी भाजपला एकटे पाडण्यासाठी सरकार स्थापन तर करा पण बाहेरून पाठिंबा देवून, असे आपण तत्कालीन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी अहमदभाईंना सांगितले होते, असे गाडगीळ 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले.

जुना कार्यकर्ता म्हणून अहमदभाईंनी मत विचारले असता आपण ते प्रांजळपणे दिले होते, असेही ते म्हणाले. सध्या सुरु असलेल्या वाझे प्रकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादीवर आरोप होत असताना कॉंग्रेस (Indian National Congress) त्यात काय भूमिका घेणार असा प्रश्न निर्माण झाला असताना गाडगीळ यांचे हे विधान महत्वाचे ठरते आहे.

सरकार स्थापन झाल्यापासून गेले वर्षभर काही ना काही कुरबूरी सुरु आहेत. मध्यंतरी आमदारांच्या निधीवरुन काँग्रेसचे आमदार नाराज झाले होते. आपल्याला महाविकास आघाडीत गृहित धरले जाते, अशीही काँग्रेस नेत्यांची भावना आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून ही भावना कानावरही घातली आहे. (Anant Gadgil Advised Outside support of Congress to Maha Vikas Aghadi)

आता परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी केलेला आरोप, अँटिलिया बाँब केस आणि मनसुख हिरेन प्रकरण यामुळे सरकार पुन्हा वादात सापडले आहे. शिवसेनेचे संजय राठोड (Sanjay Rathod) वादात सापडले व त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेही (Dhananjay Munde) वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख परमबीर सिंग यांच्या पत्रावरुन अडचणीत आले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे नेते व उर्जामंत्री डाॅ. नीतिन राऊत (Nitin Raut) हे देखील बंगल्याच्या सजावटीवरुन टीकेचे धनी बनले आहेत.

या परिस्थितीत महाविकास आघाडीत मोठी कुरबूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महाविकास आघाडीबाबतच्या भूमीकेचा फेरविचार करते आहे का, अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर अनंत गाडगीळ यांनी दिलेली माहिती महत्त्वाची ठरते आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com