अमृता फडणवीस म्हणतात, "" मुंबईने माणुसकी गमावली आहे, ती सुरक्षित राहिली नाही !''  - Amrita Fadnavis says, "Mumbai has lost its humanity, it is not safe!" | Politics Marathi News - Sarkarnama

अमृता फडणवीस म्हणतात, "" मुंबईने माणुसकी गमावली आहे, ती सुरक्षित राहिली नाही !'' 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

 सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण राष्ट्रीय मुद्दा बनत चालला असून महाराष्ट्र आणि बिहारमध्येही कलगीतुरा सुरू आहे.

मुंबई : निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबई आता अजिबात सुरक्षित राहिली नाही अशी नाराजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरण राष्ट्रीय मुद्दा बनत चालला असून महाराष्ट्र आणि बिहारमध्येही कलगीतुरा सुरू आहे. सुशांतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस योग्य पद्धतीने करीत आहेत. हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरजच नाही असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

मात्र बिहारमधील भाजप, जेडीयू , राजद आणि कॉंग्रेससह सर्वच लहानमोठे पक्ष आता सुशांत आत्महत्याप्रकरणी प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. 

आज बिहार विधानसभेत भाजप आमदारांने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली असता या मागणीला भाजपचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जाणारे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पाठिंबा दिला आहे. 

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी बिहारचे आयपीएस अधिकारी मुंबईत आले असता त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याने तर चर्चेला उधानच आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांत आत्महत्याप्रकरणी आता अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आज ट्‌विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अमृता फडणवीस म्हणाल्या, की या प्रकरणाचा ज्या पद्धतीने तपास सुरू आहे. त्यावरून मला वाटते की मुंबईने माणूसकी गमावली आहे. निदोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबई आता सुरक्षित राहिली नाही. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख