स्फोटक प्रकरणात आलेल्या धमकीमागे अंडरवल्डची मदत

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्काँर्पिओ कार सापडल्यानंतर धमकीचा आलेला संदेश पाठवण्यात अंडरवल्डची मदत घेतली गेल्याचे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेच्या नावाने हा संदेश पाठवण्यात आला होता.
Antilia Case
Antilia Case

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्काँर्पिओ कार सापडल्यानंतर धमकीचा आलेला संदेश पाठवण्यात अंडरवल्डची मदत घेतली गेल्याचे एनआयएच्या (NIA) तपासात निष्पन्न झाले आहे. जैश उल हिंद या दहशतवादी संघटनेच्या नावाने हा संदेश पाठवण्यात आला होता. Ambani Threat Mail Sent with the help of Underworld Goon

वसईतील एका हस्तकाच्या मार्फत तिहार जेल (Tihar Jail) मधील अंडरवल्डशी संबधित एका व्यक्तीशी संपर्क साधून हा संदेश पाठवण्यात आला होता, अशी माहिती एनआयएला मिळाली आहे. याबाबत एनआयएअधिक तपास करत आहे.अंडरवर्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) एके काळचा विश्वासू असलेला हा गँगस्टर सध्या तेथील एका रुग्णालयात दाखल आहे.  २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील एका स्थानिक व्यक्तीला धमकीसाठी फोन केल्या प्रकरणी या गँगस्टर विरोधात तक्रार करण्यात आली होती.

या गँगस्टरच्या वसईतील (Vasai) हस्तकाच्या मदतीने हा संदेश (Email) पाठवण्यात आला होता. तसेच मनसुख हिरेन हत्येचा तपास भरकटवण्यासाठी त्यांचे शेवटचं लोकेशन वसई दाखवण्यात आलं होते. त्यातही या हस्तकाने आरोपींना मदत केली होती का? याबाबतही एनआयए तपास करत आहे. Ambani Threat Mail Sent with the help of Underworld Goon

जैश उल हिंद नावाच्या संघटनेनं अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक ठेवल्याची जबाबदारी स्विकारल्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे एनआयए ही केस तात्काळ आपल्याकडे घेईल अशी भिती वाटू लागल्यामुळे काही तासातच ही जबाबदारी फेटळणारा संदेशही वायरल करण्यात आला होता. पण त्यानंतरही एनआयएनं ही केस ताब्यात घेतल्याने आरोपींचा डाव फसला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com