परिस्थितीचा लाभ उठवणार नाहीत, ते राजकारणी कसले? 

आता स्थानिकांच्या नोकरीचेही राजकारण केले जात असून विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना संधी द्या, यावरून उद्योजकांवर दबाव आणण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये कारखान्यांतस्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी सर्वच पक्षांचा दबाव उद्योजकांवर येत असल्याची चर्चा आहे.
 All-party politics from local youth jobs
All-party politics from local youth jobs

ठाणे ः मुंबईत कोरोनाचा धोका वाढत चालल्याने तसेच उपासमारीमुळे परप्रांतीय आपल्या गावी निघून गेल्याने स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परंतु आता स्थानिकांच्या नोकरीचेही राजकारण केले जात असून विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या लोकांना संधी द्या, यावरून उद्योजकांवर दबाव आणण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्येही कारखान्यांत जागा उपलब्ध असून येथे स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी सर्वच पक्षांचा दबाव उद्योजकांवर येत असल्याची चर्चा आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेत राजकीय पक्षांनी पक्ष मजबुतीसाठी कोरोनाची संधी साधत आपले वर्चस्व निर्माण करण्याची तयारी सुरू केली आहे. 

राज्यातील परप्रांतीय त्यांच्या राज्यात परतल्याने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा केवळ बेरोजगार तरुणांना फायदा होणार आहे, असे नाही तर राजकारण्यांनीही या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. डोंबिवली एमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, हेल्पर, मशीन ऑपरेटर, गवंडी, सुतार अशा अनेक पदांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. विविध ट्रान्सपोर्ट कंपन्यांत वाहन चालकांची जागा रिक्त झाल्या आहेत. 

कोरोनाच्या संकटातही राजकीय पक्षांना वेगळीच संधी चालून आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेत तापत्या तव्यावर पोळी भाजून घेण्याची धडपड राजकीय पक्षाचे पदाधिकारी करीत आहेत. यात महाविकास आघाडी, भाजप, मनसे असे सर्वच पक्ष आघाडीवर आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिकांना संधी ही मोहीमच हाती घेतली आहे. विविध प्रभागांतून बेरोजगार युवकांचा शोध घेऊन त्यांचे नोकरीसाठी मतपरिवर्तन करीत आहेत. बेरोजगार युवकांची यादी तयार करुन उद्योजकांकडे ती दिली जात आहे.

नोकरभरती हवी असेल, तर आम्ही माणसे पुरवू, असे पक्षाचे बडे पदाधिकारी उद्योजकांना सांगत आहेत. स्थानिकांना रोजगाराची संधी द्या, असे सांगतानाच आमचीच माणसे कामावर ठेवा, असा दबावही आणला जात असल्याचे उद्योजकांनी खासगीत बोलताना सांगितले. 

शहरातील परप्रांतीय कमी झाल्याने पक्षाच्या वोटर बॅंकेलाही त्याचा फटका बसणार आहे. शहरातील स्थानिकांनाच आता आपल्या बाजूने वळविण्यासाठी त्यांच्या समस्या उचलून धरण्याकडे राज्यकर्त्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. परप्रांतीयांच्या जाण्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा युवकांआधी राजकारण्यांनीच घेतला असून नावनोंदणी करून हमखास नोकरी मिळवा, अशी मोहीमच जणू शहरात उघडल्याचे दिसते. 

एमआयडीसीतील अत्यावश्‍यक सेवा देणारे कारखाने सद्यस्थितीत सुरू आहेत. काही कारखान्यांना बंदच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मजुरांची कमतरता, कंपनीवर येणारा आर्थिक ताण आदी गोष्टींमुळे उद्योजक सध्या चिंतेत आहेत. स्थानिकांना संधी देण्यात येईलही; परंतु ही कामे करण्यास स्थानिक तयार आहेत का?, स्थानिकांकडून अनेकदा उद्योजक, कंपन्यांवरही दबाव आणला जातो. या गोष्टीचाही उद्योजकांना विचार करावा लागणार आहे. त्यामुळे आत्ताच या परिस्थितीविषयी काही बोलणे शक्‍य नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. 

 
स्थानिकांच्या रोजगारावरून सर्वपक्षीयांत स्पर्धा 

घारीवली गावचे माजी सरपंच तथा मनसे प्रतिनिधी योगेश पाटील यांनी यापूर्वीच उद्योजक संघटनेकडे स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी केली आहे. आगरी युथ फोरमचे गुलाब वझे यांनीही कामा संघटनेची भेट घेत त्यांना निवेदन दिले. भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनीही कामा संघटनेकडे संपर्क साधला असून मंगळवारी भाजपची कामा संघटनेसोबत यासंदर्भात एक बैठक होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com