अर्थसंकल्प २०२१ - आरोग्य सेवा सुधारणेसाठी अजितदादांनी केली ७५०० कोटींची तरतूद

राज्य शासनाने राज्यातल्या आरोग्य सेवांच्या सुधारणांसाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असल्याची घोषणा अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.
Ajit Pawar Proposed Big Funds for Health Sector
Ajit Pawar Proposed Big Funds for Health Sector

मुंबई : गेले वर्षभर संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. त्यामुळे आरोग्य सेवा सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्य शासनाने राज्यातल्या आरोग्य सेवांच्या सुधारणांसाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असल्याची घोषणा अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.

अजित पवार यांनी आज २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठीचा महाविकास आघाडीचा दुसरा  अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत व कोविड योद्ध्यांना अभिवादन करत पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वचन डोळ्यांसमोर ठेऊन राज्यातले महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. 
कोविड योद्धयांना अभिवादन करतो. कोविड योद्ध्या महिलांच्या कामाचा सन्मान करतो.

राज्याच्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा व वाढ करण्यासाठी ७५०० कोटींचा प्रकल्प तयार केला असून ४ वर्षांत पूर्ण केला जाईल. त्यात ट्राॅमा केअर, उपकेंद्रे, आरोग्य केंद्रे यांच्या बांधकामांचा समावेश आहे. आरोग्य आयुक्तालाच्या अखत्यारीत आरोग्य संचनालय स्थापन करुन दर्जेदार सुविधांसाठी ५ हजार कोटी रुपये देण्यात येतील. ८०० कोटी या वर्षी देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागासाठी ठळक तरतुदी
- पुण्यातील औंध येथे संसर्गजन्य विकार रुग्णालय सुरु करण्यात येईल. 
 - २४ तासांत अँजिओग्राफी होण्यासाठी ८ ठिकाणी कार्डिअॅक सेंटर सुरु करणार
- शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक उपकरणे बसविणार
 - अमरावती, परभणीतही वैद्यकीय महाविद्यालये सुरु होणार
- बी.जे. महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देणार
- ११ शासकीय परिचारिका विद्यालयांचे महाविद्यालयांत रुपांतर करणार
- कोविडमधून बरे झालेले रुग्ण याना फुफूस आणि इतर आजार दिसून येत आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कोविड पश्चात उपचार व समुपदेशन केंद्रे सुरु करणार 
- सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड व साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com