Agreements with companies in China are as they are now ... | Sarkarnama

चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या जैसे थे... 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 जून 2020

एकूण 5 हजार 020 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले आहे.  

मुंबई : हेंगली, पीएमआय इलेक्‍ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि.15 जून, 2020 रोजी केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. 

हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

हेंगली, पीएमआय इलेक्‍ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्सया तीन कंपन्यांनी अनुक्रमे 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूकराज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे.

एकूण 5 हजार 020 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले आहे.  

 चिनी वस्तूंवर बहिष्कारासाठी आंदोलन
चिनी सैन्याने भारतीय जवानांवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर हर्णे यांच्या नेतृत्वाखाली  मानखुर्द येथील शिवनेरी नगरमध्ये आंदोलन झाले. या वेळी चिनी वस्तू तसेच चिनी मोबाईल ऍपवर बहिष्कार घालण्याचे आवाहनदेखील केले. 

 या वेळी चीनमधून आयात करण्यात आलेल्या वस्तूंवर तसेच मोबाईलमध्ये वापरण्यात येणाऱ्या चिनी ऍपवर बहिष्कार घालण्याचे आवाहन नागरिकांना केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख