तुमच्या धमक्यांना xxवर मारतो; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर अश्लाघ्य टीका

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यानिमित्त केलेले भाषण भाजपला व विशेषतः राणे बंधूंना चांगलेच झोंबले आहे. आमदार नितेश राणेंपाठोपाठ माजी खासदार निलेश राणे यांनी अश्लाघ्य भाषेत ट्वीट करुन ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे.
Nilesh Rane - Uddhav Thackeray
Nilesh Rane - Uddhav Thackeray

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यानिमित्त केलेले भाषण भाजपला व विशेषतः राणे बंधूंना चांगलेच झोंबले आहे. आमदार नितेश राणेंपाठोपाठ माजी खासदार निलेश राणे यांनी अश्लाघ्य भाषेत ट्वीट करुन ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे. 

''छोट्या फावड्याला वाचवण्यासाठी मोठा फावडा काल इतका बरळत होता की त्याचं त्यालाच कळलं नाही तो काय बोलतोय. ज्यांच्या घरात घाणेरडी लफडी आहेत ते दुसऱ्यांवर गल्लीच्या कुत्र्यासारखे भुंकले. सम्राठाची लफडी महाराष्ट्राला कळली तर xxx लपून महाराष्ट्र सोडावा लागेल,'' असे निलेश यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.

दुसऱ्या ट्वीटमध्ये निलेश राणे म्हणतात......नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा... तुमच्या धमक्यांना आम्ही xxवर मारतो.

राणे बंधू पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचा उल्लेख नेहमीच 'पेंग्विन' असा करतात. उद्धव यांचे दुसरे पूत्र तेजस ठाकरे यांनी नुकतीच एक दुर्मीळ पाल शोधून काढली आहे. याचा संदर्भ घेतल निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर तिसऱ्या ट्वीटमधून निशाणा साधला आहे....आम्ही फावड्याचे असे केले हाल, एक पोर झाला पेंग्विन आणि दुसरा जंगलातली पाल,' असे म्हणत निलेश यांनी टीका केली आहे. 

दुसरीकडे आमदार नितेश राणेंनीही उद्धव ठाकरेंवर दसरा मेळाव्यातल्या भाषणावर टीका केली आहे. ''काही जणांनी तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या ठाकरे कुटुंबावर केल्या. त्यांना मी सांगतो की, त्यांनी आता ते गिळावे अन गप्प बसावे. कारण आमचे हात स्वच्छ आहेत. स्वत: शेण खायचे आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा अशी यांची पद्धत आहे,'' असे ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले होते. त्यावर नितेश यांनी टीका केली आहे. 

"''दुसऱ्याची पिल्लं वाईट, मग यांनी के त्या dino च्या खुशीत नशा करून मुलीवर अत्याचार करणारा श्रावण बाळ जन्माला घातला आहे का, असाही खोचक सवाल नितेश यांनी केला बिहारच्या आगोदरच  पक्ष प्रमुखांनी व्हॅक्सिन घेतलेले दिसते, जास्तच हवा भरलेली आज, किती आव टाचणी तयार आहे फक्त योग्य वेळ येऊ द्या. इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!'' अशी टीका नितेश यांनी केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com