Mumbai Police to get Smart Bikes for Patrolling | Sarkarnama

मुंबई पोलिस घालणार 'धूम स्टाईल' गस्त

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 जुलै 2020

पोलिस दलात नव्या कोऱ्या '२५० सीसी स्पोर्टस्‌ बाईक' सामील होणार आहेत. सध्या वाहतूक पोलिसांना अशा १० बाईक मिळाल्या आहेत. त्या उंचीला कमी, जलद वेग आणि पोलिसांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा त्यात असणार आहेत ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे बुलेटवरुन फिरणारा सिंघम पोलिस आता धूम स्टाईल दुचाकीवरून गस्त घालताना दिसणार आहे.

मुंबई  कोरोनाच्या लढाईत मुंबई पोलिस एका  योद्‌ध्याच्या भूमिकेत आघाडीवर होते. आता हेच योद्धे 'कूल बाईक'वरून 'धूम स्टाईल'ने गस्त घालताना दिसणार आहेत. कारण मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आता नव्या "२५० सीसी स्पोर्टस्‌ बाईक' सामील झाल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी तीन वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील अभिनव व उत्तम यंत्रणा तयार केली आहे. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी नवनवीन प्रयोगदेखील करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांकडे देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा आहे. त्याचा वापर करत मुंबई  पोलिस दलाने आपली कार्यक्षमता व पारदर्शकतादेखील वाढवली आहे. मुंबई पोलिस माहिती यंत्रणा (एमपीआयएस), ऑटोमेटेड बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम, एम पासपोर्ट, संवाद ऍप्स, ट्‌विटर हॅंडल, मोबाईल सर्व्हेलन्स वाहने, यामुळे पोलिसांच्या कामाला पूर्वीपेक्षा खूपच वेग आला आहे.

त्यात आता पोलिस दलात नव्या कोऱ्या '२५० सीसी स्पोर्टस्‌ बाईक' सामील होणार आहेत. सध्या वाहतूक पोलिसांना अशा १० बाईक मिळाल्या आहेत. त्या उंचीला कमी, जलद वेग आणि पोलिसांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा त्यात असणार आहेत ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे बुलेटवरुन फिरणारा सिंघम पोलिस आता धूम स्टाईल दुचाकीवरून गस्त घालताना दिसणार आहे. याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ यांनी सांगितले की, मुंबईतील मुख्य रस्त्यांवरील प्रमुख वाहतूक चौक्‍यांवर या दुचाकी देण्यात येणार आहेत.

नव्या संकल्पना स्वीकारल्या
काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी त्यांच्या दलात अश्‍वदलाचा समावेश करून घेतला. ८८ वर्षांनी हे युनिट पुन्हा सुरू होत आहे. या दलामध्ये ३० घोडे आहेत. त्यानंतर लगेचच समुद्रकिनारी गस्तीसाठी पन्नास  'सॅग वे'चा पोलिस दलात समावेश करून घेतला गेला आहे. यातील १० 'सॅग वे' हे वरळीसाठी; तर पाच नरिमन पॉइंटसाठी आहेत. त्याचप्रमाणे वांद्रे, जुहू, वर्सोवा या ठिकाणीदेखील हे 'सॅग वे' देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख