minister and ncp leader jitendra awhad bairthday | Sarkarnama

जितेंद्र आव्हाड : आक्रमक, लढवय्या, संघर्षशील नेता 

महेश जगताप 
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

आव्हाड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.

पुणे : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अभ्यासू , रोखठोक ,आणि शाहू ,फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुरोगामी वाटचाल करणारे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर निष्ठावंत अशी ओळख असलेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस . 

आव्हाड हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत. हाच त्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. अनेकांनी येऊन या मतदारसंघात आव्हाड यांना राजकीय टक्कर देण्याचा प्रयत्न केला पण, आव्हाड यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत करीत आपली ताकद दाखवून दिली . 

संघर्ष करणे हा माझा आत्मा आहे .तो मी करणारच. हे आवर्जून सार्वजनिक भाषणात सांगतात .त्यामुळे त्यांची ओळख लढवय्ये नेते म्हणूनच राहिली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जरी ते असले तरी त्यांनी स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. पुरोगामी विचारांची पाठराखण करणारे नेते असल्याने तरुणांना त्यांचं आकर्षण कायम राहिल आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण पिढी त्यांच्या पाठीमागे सातत्याने उभी असते . 

ज्या वेळी पक्ष अडचणीच्या काळात होता त्यावेळी त्यांनी निष्ठेने राहून पक्षाला पाठबळ देण्याचं काम केले .आव्हाड यांच्या काही भूमिका ,घटना मोठ्या वादग्रस्तही ठरल्या असल्याने विरोधकांचा व पक्षांतर्गत टीकेचा सामना करावा लागला पण पवार यांचे भक्कम पाठबळ असल्याने आव्हाड विचलित झाले नाही . 

आव्हाड हे जरी आक्रमक वाटत असले तरी मनाने तेवढेच हळवे आहेत. असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. एकदा आव्हाड व त्यांचे गाडीचालक यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून थोडासा वाद झाला. तसे ते गेल्या 40 वर्षांपासून मित्रच .पण चालक यांनी वाद झाला म्हणून आठ दिवस बोलण्याचे टाळले .ते दररोज गाडी चालवायचे पण जास्त बोलायचे नाहीत .दिलदार स्वभावाच्या आव्हाडांनी स्वतः पुढाकार घेत पुन्हा पहिल्यासारखे संभाषण सुरू केले. 

कोरोनाच्या संकटात काम करीत असताना त्यांना या व्हायरस ने गाठले . त्यावेळी त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती पण त्यातून ते सहीसलामत बाहेर पडले. त्यामुळे त्यांनी वाढदिवसानिमित्त प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एक आक्रमक, लढवय्या, संघर्षशील म्हणूनच त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख