पंतप्रधान मोदींचा वाढदिवस युवक काँग्रेस अनोख्या पद्धतीने साजरा करणार

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनेही भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर कार्यपद्धतीवर टीका करण्यासाठी अनोखा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
Satyajeet tambe3.jpg
Satyajeet tambe3.jpg

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे पाहता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसनेही भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर कार्यपद्धतीवर टीका करण्यासाठी अनोखा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. Youth Congress will celebrate Prime Minister Modi's birthday in a unique way

या उपक्रमा संदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मुंबईतील गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. या पत्रकार परिषदेला युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी हरपालसिंग, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी, सुबोध कुमार आदी उपस्थित होते.

हेही वाचा...

सत्यजित तांबे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे खोटे आश्वासन दिले होते. सत्तेत आलेल्या मोदी यांनी 7 वर्षांत हे आश्वासन पाळले नाही. रोजगार निर्मिती दूर राहिली जे रोजगार होते ते ही गेले. 45 वर्षांतील सर्वांत जास्त बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला. 

युवकांची स्वप्नं धुळीस मिळवून त्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. उद्या 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींना आंदोलनरुपी वाढदिवसाची भेट देणार आहोत.

मोदी सरकारने युवकांची घोर फसवणूक केली आहे. रोजगार निर्मितीच्या बाबतीत मोदी सरकार अपयशी ठरली. ही बेरोजगारी वाढण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारची आर्थिक धोरणे कारणीभूत आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढत आहे. देशातले उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीत भर पडत असून फोर्डने नुकतेच भारतातील उद्योग बंद केल्याने प्रत्यक्ष 4 हजार तर अप्रत्यक्ष जवळपास 40 हजार लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत.

हेही वाचा...

सुशिक्षित तरुणांनी पकोडे तळावे, चहाच्या टपऱ्या चालवाव्या, बुट पॉलिश करावी अशी मोदी व भाजपची इच्छा आहे. म्हणून तरुणांची फसवणूक करणाऱ्या मोदींना वाढदिवसाची भेट म्हणून राज्यभर सर्व जिल्हा आणि तालुकास्तरावर उद्या (ता. 17) आंदोलनरुपी भेट दिली जाणार आहे, असे तांबेंनी सांगितले.

मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी यांनी सांगितले की, मुंबई शहरासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगारी दिवस पाळला जाणरा आहे. मुंबई शहरातील विविध भागांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असे सिद्दीकी म्हणाले.


‘राष्ट्रीय भाषण स्पर्धा’ आयोजन

तरुणांमधून उत्तम वक्ते तयार व्हावे यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने ‘यंग इंडिया के बोल’ ही राष्ट्रीय भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशभर विविध राज्यात जिल्हा आणि तालुका स्तरावर ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतून उत्कृष्ट भाषण करणाऱ्या वक्त्यामधून युवक काँग्रेसचे प्रवक्ते बनण्याची संधी दिली जाणार आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. उत्कृष्ट भाषण कला असणाऱ्यांना युवक काँग्रेसकडून व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

महागाई, कोरोना परिस्थिती हाताळण्यातील मोदी सरकारचे अपयश, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन, कृषी विरोधी काळे कायदे, हे भाषणाचे विषय असतील अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दिली.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com