महाराष्ट्र सरकार जिंदाबाद 

मुळशीतालुक्‍यातील परप्रांतीय मजूर आजस्वगृही रवाना करण्यात आले. त्यावेळी कासार आंबोली येथील मजुरांनी या घोषणा दिल्या आणि मुळशीतहसील, पोलिस यांच्यासह महाराष्ट्र सरकारबद्दल कृतज्ञता आणि गौरव व्यक्त करण्यात आला.
Workers are sent from Mulshi to their hometowns
Workers are sent from Mulshi to their hometowns

पिरंगुट ः "तहसीलदार मुळशी जिंदाबाद', "पौड पोलिस जिंदाबाद', "महाराष्ट्र सरकार जिंदाबाद ऽ जिंदाबादऽऽ अशा जल्लोषातील घोषणा मजुरांनी बसमधूनच दिल्या आणि मुळशी तालुक्‍याचा एक नवा "मुळशी पॅटर्न' समोर आला. 

तालुक्‍यातील परप्रांतीय मजूर आज मुळशीतून स्वगृही रवाना करण्यात आले. त्यानिमित्त कासार आंबोली येथील मजुरांनी या घोषणा दिल्या आणि मुळशी तहसील, पोलिस यांच्यासह महाराष्ट्र सरकारबद्दल कृतज्ञता आणि गौरव व्यक्त करण्यात आला. तहसील कार्यालय, पौड पोलिस आणि राज्य सरकारच्या कामाची ही पावती मिळाल्याचे समाधान मुळशीकरांना मिळाले. 

कासार आंबोली येथे तहसीलदार अभय चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या उपस्थितीत या मजुरांना निरोप देण्यात आला. येथून मध्य प्रदेशला दोनशे मजुरांना सरकारतर्फे नऊ पीएमपी बसने पुण्यापर्यंत पाठविण्यात आले. सोशल डिस्टन्स ठेवून प्रत्येक बसमध्ये वीस लोक बसविण्यात आले होते. प्रत्येकाला चहा व नाश्‍त्यासाठी पोहे देण्यात आले होते. जाताना या कामगारांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता. 

पिरंगुट येथील जय तुळजा भवानी टेकडीच्या परिसरातून अकरा बस मजूर व कामगारांना घेऊन त्यांच्या गावाकडे पाठविण्यासाठी पुण्याकडे रवाना झाल्या. भूगाव येथील जनसेवा फाउंडेशनच्या वतीने भूगाव येथून 125 मजूर त्यांच्या गावी पाठविण्यात आले. गावातील महिला बचतगट व ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना भोजन देण्यात आले. 
 

परप्रांतीय कामगारांना मूळगावी पाठविण्यात अडचणी 

राजगुरुनगर : परतीच्या मार्गावर निघालेल्या परप्रांतीय कामगारांना, काही राज्यांच्या प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याने महाराष्ट्राच्या सीमेवर गर्दी होत आहे. त्यामुळे उद्‌भवणाऱ्या अडचणींबाबत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी 15 मे रोजी लोकसभा सचिवांशी मोबाईलवर चर्चा करून मार्ग काढण्याची मागणी केली. 

परराज्यातील कामगारांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी खेड तालुका प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची पाहणी करताना त्यांनी ही चर्चा केली. 
खेड तालुक्‍यातून आपापल्या राज्यात आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यात परत जाणाऱ्या कामगारांची व्यवस्था निलकमल कार्यालय व खेड विश्रामगृहात करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी भेट देऊन खासदारांनी आढावा घेतला. खेड तालुक्‍यातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ज्या परप्रांतीयांना मूळ गावी जाण्याची इच्छा आहे, त्यांना परत पाठविण्यासाठी खेड तालुका प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे. 

या वेळी डॉ. कोल्हे यांनी काही कामगारांनाही संवाद साधून अडीअडचणींची माहिती घेऊन त्यांना दिलासा दिला. परजिल्ह्यांतील कामगारांना घरी परतण्यासाठी परवानगी मिळण्याची प्रक्रिया वेगवान करण्याच्या सूचना सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी आपण पालकमंत्र्यांशी चर्चा करू, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com