भाजप शिवसेनेसोबत जाणार की नाही? फडणवीस म्हणाले....  - Will BJP go with Shiv Sena or not? Fadnavis said .... | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप शिवसेनेसोबत जाणार की नाही? फडणवीस म्हणाले.... 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 28 जुलै 2020

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आगामी काळात राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे सांगून पाटील यांचे म्हणणे खोडून काढले आहे. 

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आगामी काळात राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे सांगून पाटील यांचे म्हणणे खोडून काढले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना आगामी काळात राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहे. पण, आगामी काळात आम्ही शिवसेनेसोबत एकत्र निवडणुका लढवणार नाही. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आगामी निवडणुका स्वबळावरच लढवणार आहे. निवडणुका स्वतंत्र लढून राज्याच्या हितासाठी मात्र पुन्हा एकत्र येऊ, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. 

चंद्रकांत पाटील यांच्या शिवसेनेसोबत जाण्याच्या वक्तव्याचे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र खंडन केले आहे. शिवसेनेसोबत जाण्याचा आमचा कोणताही प्रस्ताव नाही आणि शिवसेनेकडून तसा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. त्या मुळे या संदर्भातील कोणतीही चर्चा आता आमच्यासमोर नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. या वक्तव्यानंतर त्यांना शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्‍न विचारण्यात आला होता. मात्र, असा कोणताही प्रस्ताव सध्या नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. 

शिवसेनेबरोबर एकत्र यायला तयार : पाटील 

कोल्हापूर : भाजप प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला असलातरी राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. एकत्र आलो तरी निवडणुका मात्र आम्ही वेगळ्याच लढणार, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 

ते पुढे म्हणाले की, "एकत्र निवडणूक लढवायची, मोदींची व्होटबॅंक, त्यांनी केलेल्या कामाचा फायदा घेण्याचं काम शिवसेनेने केले आहे. ज्यांच्याविरोधात लढलात, त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं, अशी टीकाही पाटील यांनी केली आहे. सध्याचं सरकार राज्याचं हित पाहत नाही. त्यांच्यात समन्वय नाही. दररोज वेगवेगळे निर्णय घेतले जातात. ही सगळं पाहिल्यानंतर पाहिल्यानंतर सरकार नीट चाललंय की नाही यावर चौथीतला मुलगा किंवा मुलगीसुद्धा निबंध लिहिल, असंही पाटील म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांनी केली होती टीका 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार आर्तंविरोधामुळे कोसळेल असा दावा करत तोपर्यंत आपण थांबायला तयार असल्याचे सांगितले होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी झाली. या बैठकीत फडणवीस बोलत होते. 

Edited By Vijay dudhale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख