इंधन दरवाढ व बेराजगार वाढ हेच का मोदींचे अच्छे दिन - महेश तपासे

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकारवर आज जोरदार टीका केली.
mahesh tapase ncp.jpg
mahesh tapase ncp.jpg

मुंबई : देशात इंधर दर वाढीने जनता त्रस्त आहे. याच नोटा बंदी, जीएसटी व कोरोना लॉकडाउन अशा सलग संकटांनी बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. व्यापारीही आर्थिक संकटांमुळे त्रस्त आहेत. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलने करून भाजपला लक्ष केले जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केंद्र सरकारवर आज जोरदार टीका केली. ते म्हणाले, एप्रिल ते जुलै या चार महिन्यात सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावत पेट्रोल- डिझेलवरील एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून केंद्रसरकारने तब्बल एक लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे त्यामुळे मोदी सरकारचे हेच अच्छे दिन आहे का?

हेही वाचा...

ऑगस्ट महिन्यात साडे पंधरा लाख लोकांचे रोजगार गेले. बेरोजगारीने साडे आठ टक्क्यांच्यावर उच्चांक गाठला आहे. लोकांचा खिसा खाली करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. 


पेट्रोल- डिझेल - गॅसमध्ये सवलत देण्याऐवजी केंद्रसरकार कोटीत कमाई करत आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदीसरकारने गेल्या दीड वर्षात आर्थिक चक्र बिघडवले आहे. 

दरम्यान सर्वसामान्यांना सवलत देण्याचे धोरण मोदी सरकारकडे नाही हे आता स्पष्ट झाले आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

Edited By - Amit Awari

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com