जयंतराव, घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचे ऑडिट कोण करणार ? 

कोविड आपत्तीच्या काळात अनेक डॉक्‍टरांच्या कारभाराबाबत उघड नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे फक्त पैशाचे नव्हे; तर डॉक्‍टरांच्या कामाचे ऑडीट होण्याची गरज आहे.
Who will audit the work of the Chief Minister sitting at home Jayantrao?
Who will audit the work of the Chief Minister sitting at home Jayantrao?

मुंबई : "डॉक्‍टरांच्या कामाचे ऑडिट होऊन जाऊ द्या; परंतु घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचे ऑडिट कोण करणार जयंतराव?' असा बोचरा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना केला आहे. 

कोविड आपत्तीच्या काळात अनेक डॉक्‍टरांच्या कारभाराबाबत उघड नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे फक्त पैशाचे नव्हे; तर डॉक्‍टरांच्या कामाचे ऑडीट होण्याची गरज आहे. मृत्यूदर का वाढतोय, यावरही चर्चा होण्याची आवश्‍यकता आहे, असे मत जयंत पाटील यांनी सांगलीत व्यक्त केले होते. 

दक्षिण भारतीय जैन सभेच्या वतीने चोपडे मेमोरियल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये डेडीकेट कोविड सेंटरचे उद्‌घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी जयंत पाटील यांनी वरील भावना बोलून दाखविली होती. पाटील यांचा हाच मुद्दा घेऊन भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. 

महाविकास आघाडीवर टीका करताना भारतीय जनता पक्षाकडून कॉंग्रेस, राष्ट्रवादीऐवजी शिवसेनेला टार्गेट केले जाते. अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरूनही ठाकरे कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात आले होते. भाजपचे प्रदेश स्तरावरील सर्व नेते शिवसेनेवर चौफेर टीका करत होते. 

कंगना प्रकरणातही मुंबई महापालिका आणि शिवसेना नेत्यांना विविध मुद्यांच्या आधारे भाजपने धारेवर धरले होते. कंगनाच्या घरावर करण्यात आलेल्या कारवाईवेळी शिवसेना नेत्यांच्या अनाधिकृत कार्यालयाचा दाखला देत सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर असलेली अनधिकृत बांधकाम दिसत नाहीत का? वांद्रयातील घुसखोरांच्या चार मजली इमारती दिसत नाहीत का? असे सवाल भातखळकर यांनीच शिवसेनेला केले होते. 

निवृत्त नौदल अधिकाऱ्यास शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीवरूनही भाजपने शिवसेनेविरोधात आवाज उठविला होता. त्या वेळी आमदार भातखळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती. तसेच, आंदोलन केले होते. संधी मिळेल, त्या वेळी भाजपने सेनेला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून तर भाजपचा प्रत्येक नेता उद्धव ठाकरे यांना घरातून बाहेर पडून जनतेत मिसळा, असे आव्हान देत आला आहे. आजही मंत्रिमंडळातील सहकारी असलेले जयंत पाटील यांनी सांगलीत केलेल्या विधानाचा मुद्दा घेऊन घरी बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे ऑडीट कोण करणार, असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com