उद्धव ठाकरे म्हणतात...राम का नाम बदनाम ना करो!

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना शिवसनेची पुढील ध्येयधोरणे आणि पक्षसंघटन मजबुतीसाठी बैठक बोलावली होती. त्यावेळी ठाकरे यांनी राममंदीरासाठी गोळा केल्या जात असलेल्या वर्गणीवरुन भाजपवर निशाणा साधला
Uddhav Thackeray Targets BJP over Ram Mandir issue
Uddhav Thackeray Targets BJP over Ram Mandir issue

मुंबई  : रामाच्या नावाने काही जण घरोघरी पोहचत आहेत. मंदिर उभारणीसाठी वर्गणी गोळा करत आहेत; पण पैसे मागण्यासाठी शिवसेनेला तसे करायचे नाही, असा टोला लगावत 'देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो' अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्र सोडले.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा बंगल्यावर राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना शिवसनेची पुढील ध्येयधोरणे आणि पक्षसंघटन मजबुतीसाठी बैठक बोलावली होती. त्या वेळी ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, ''बाबरी मशीद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती; पण आता भाजपची मंडळी मंदिर उभारणीच्या नावाखाली पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आली आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार, असेही ही मंडळी म्हणतात; पण हिंमत असेल तर पाकिस्तान व बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा. मग आम्ही तुमचे स्वागत करू,'' अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. 

दरम्यान, राष्ट्रवादाच्या गोष्टी करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात कुठेही नव्हता, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.आगामी काळात शिवसेना देशाचे नेतृत्व करील, असा विश्‍वास व्यक्त करताना ठाकरे म्हणाले, की दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय न घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले. शिवसेनेने त्याच वेळी सर्व राज्यात निवडणुका लढवल्या असत्या तर आज वेगळी परिस्थिती असती, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

२३ पासून 'शिव संपर्क अभियान'
येत्या २३ ते २७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या राज्यव्यापी शिवसंपर्क अभियानाची रूपरेषा उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर मांडली. प्रत्येक नागरिकापर्यंत शिवसैनिक पोहचला पाहिजे, असे सांगताना त्यांच्या सर्व अडीअडचणी शिवसैनिकांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहचतील याची काळजी घेण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com