उद्धव ठाकरे स्वयंघोषित नव्हे; जनतेने निवडलेले मुख्यमंत्री 

"उद्धव ठाकरे हे स्वयंघोषित मुख्यमंत्री नसून त्यांना महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्रिपदी बसवले आहे,' असे प्रतित्त्युर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.
Uddhav Thackeray is not self-proclaimed; Chief Minister elected by the people
Uddhav Thackeray is not self-proclaimed; Chief Minister elected by the people

मुंबई : "उद्धव ठाकरे हे स्वयंघोषित मुख्यमंत्री नसून त्यांना महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्रिपदी बसवले आहे,' असे प्रतित्त्युर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले. 

ठाकरे सरकारमध्ये काही स्वयंघोषित मुख्यमंत्री आहेत, हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केला होता. त्याबाबत विचारले असता मंत्री पाटील यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घ्यायचे असतात. त्यानुसार ठाकरे हे राज्यातील संपूर्ण जिल्ह्याचा, शहराचा आढावा घेत असतात आणि तेच निर्णय घेत आहेत. 

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद आहेत. ठाकरे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेनशीप आहे, अशी बोचरी टीकाही फडणवीस यांनी केली होती. त्यावर जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले की लिव्ह इन रिलेनशीप मोडते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची लिव्ह इन रिलेनशीप होती. त्याचं पटलं नाही, त्यामुळे त्यांनी एकमेकांना सोडलं. आमच्याकडे तशी परिस्थिती नाही, आम्ही एकमताने काम करत आहोत. 

"शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष या तिघांची वेगवेगळी मत आहेत. मात्र, आम्हाला माहिती आहे की कुठे थांबायचे. ही लिव्ह इन रिलेनशीप नाही. ही पंचवीस वर्षे महाराष्ट्रात काम करणारी व्यवस्था आहे. शिवसेनेला भारतीय जनता पक्षाचा जो अनुभव आला. तो अनुभव आल्यानंतर शिवसेनेने भाजपला सोडून दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली. त्या मुळे देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य नाही,' असे पाटील यांनी या वेळी सांगितले. 

मुंबईतील शिवाजी पार्कवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही शपथा घेतल्या आहेत. राज्यातील जनतेच्या हिताचेच निर्णय आमचे सरकार घेत आहे आणि घेत राहील. मागील सरकारच्या काळात भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवर किती अन्याय केला आहे, हे सर्वश्रुत आहे, त्यावर मी जास्त बोलणे योग्य होणार नाही, असेही पाटील म्हणाले. 

सरकारमधील समन्यवयाचा अभावाबद्दल जयंत पाटील म्हणाले की तीनही पक्षात समन्यव आहे. काही गोष्टी अवगत केल्या जातात. उद्धव ठाकरे हे मोकळ्या मनाने काम करत असतात. काही गोष्टी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांचा परामर्श ते घेत असतात. 

विरोधकांनी सहकार्याची भूमिका घेणे अपेक्षित आहे. स्थानिक सूचना, सुधारणा सांगायच्या असतील तर कराव्यात, त्याचे सरकार स्वागतच करेल. सध्याच्या कोरोनाच्या काळात राजकारण न करता या संकटावर मार्ग कसा काढायचा, यासाठी सरकारला भाजपने साथ द्यावी, असे आवाहनही जलसंपदा मंत्र्यांनी केले आहे. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com