उद्धव ठाकरेंनी दिले आदित्यच्या जोडीला कार्यक्षम अधिकारी - Uddhav Thackeray gave efficient officers for Aditya's ministry | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरेंनी दिले आदित्यच्या जोडीला कार्यक्षम अधिकारी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 17 जुलै 2020

प्रशासकीय बदल्या आणि नियुक्त्या यावरून गेली महिनाभर राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यास काँग्रेसने सक्त विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इच्छा असूनही मेहता यांना पुन्हा मुदतवाढ देता आली नव्हती.

पुणे : प्रशासकीय बदल्या आणि नियुक्त्या यावरून गेली महिनाभर राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यास काँग्रेसने सक्त विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इच्छा असूनही मेहता यांना पुन्हा मुदतवाढ देता आली नव्हती.

त्यानंतर मुंबईतील पोलिस उपायुक्त दर्जाच्या बदल्या विचारात न घेता केल्याने ठाकरे यांनी त्या तातडीने रद्द केल्या होत्या. तो धुरळा खाली बसतो न बसतोच तो आज (ता. १७ जुलै) मुख्यमंत्री ठाकरे यांनी मित्रपक्षाच्या नव्हे तर मुलगा आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे बदल्यांच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. 

अजोय मेहता हा कारभार करताना मंत्र्यांना विचारात घेत नाहीत, अशी तक्रार काँग्रेस नेत्यांनी त्यांना मुदतवाढ देण्यास विरोध केला होता. तो विषय प्रतिष्ठेचे करत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचा विरोध लक्षात घेऊन मेहता यांना मुदतवाढ देण्याची इच्छा असूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुदतवाढ दिली नाही. पण, ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्र्याचे सल्लागार म्हणून नेमले होते. तो विषय संपतो न संपतोय तोच पुन्हा एक बदली प्रकरण पुढे आले. त्याला राजकीय घडामोडींची किनार होती. 

गृहमंत्रालयाने मुंबईतील उपायुक्त दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत्या. एकीकडे मुंबईत कोरोना वाढत असताना या झालेल्या बदल्यांनी राज्यभरातून नाराजी व्यक्त होत होती. त्यातच नगर जिल्ह्यातील पारनेरचे शिवसेनेचे पाच नगरसेवक महाआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पळविले होते. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता होती. त्यातून विश्वासात न घेता गृहमंत्रालयाने केलेल्या या बदल्या उद्धव ठाकरे यांनी तातडीने रद्द केल्या. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मध्यस्थी करत पारनेरचे नगरसेवक पुन्हा शिवसेनेत पाठविण्यात आले. त्यानंतर त्या बदल्या करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिली. परंतु त्यामुळे महाविकास आघाडी पक्षातील विसंवाद या निमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला होता. 

उद्धव ठाकरे यांनी आज मुलगा आदित्य यांच्या पर्यटन आणि पर्यावरण मंत्रालयात मोठे बदल केले आहेत. मनीषा पाटणकर-म्हैसकर यांची राज्य शिष्टाचार मंत्रालयाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि प्रमुख राज्य शिष्टाचार अधिकारीपदावरून पर्यटन मंत्रालयाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी पदावर बदली करण्यात आली आहे. पर्यटन मंत्रालयाच्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर मुंबई महापालिकेचे सहआयुक्त आशुतोष सलील यांची बदली करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्याच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी अचानक केलेल्या महत्वाच्या बदल्यांमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Edited By : Vijay Dudhale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख