Those sitting in the back say that the rickshaw has to be taken there: Fadnavis | Sarkarnama

मागे बसलेले सांगतात, तिकडेच रिक्षा न्यावी लागते  ः फडणवीसांचा ठाकरेंना टोला 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 28 जुलै 2020

तीन चाकांच्या रिक्षाचे स्टेअरिंग आपल्या हाती आहे. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत मागे बसलेले लोक म्हणतील तिकडेच रिक्षा न्यावी लागते, असा टोला लगावला आहे. 

मुंबई  : तीन चाकांच्या रिक्षाचे स्टेअरिंग आपल्या हाती आहे. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत मागे बसलेले लोक म्हणतील तिकडेच रिक्षा न्यावी लागते, असा टोला लगावला आहे. 

महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा आपला कोणताही इरादा नाही, हे वेळोवेळी स्पष्ट केले असल्याने आता त्यांनी सरकार चालवून दाखवावे. लोकोपयोगी निर्णय घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. देशात सतराव्या क्रमांकाच्या चाचण्या केल्या जात आहेत. मुंबईत तर चाचण्या कमी केल्या जातात, ते प्रमाण वाढायला हवे, असे वारंवार लक्षात आणून दिले, पण सरकार ऐकत नाही. बियाणे नाही, शेतकऱ्यांना दिलासा नाही, दुधाला भाव नाही. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करण्याचे भाजपने लक्षात ठेवले आहे. कोरोनात मदतकार्य करताना कार्यकर्ते गेले, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे, असेही ते म्हणाले.

 
मी कारसेवक, जेथे असेन तेथून कार्यक्रमात सहभागी होणार

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होते आहे. तेथे कुणाला निमंत्रण आहे याची कल्पना नाही. अनेकांना तेथे जायची इच्छा आहे, सुरक्षित अंतर राखून पूजा करावी असे सांगतो. मी कारसेवक आहे, मी जेथे असेन तेथून या समारंभात सहभागी होईन. हा गौरवाचा क्षण आहे, असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मुंबईत भाजपचा ‘रक्षक बंधन’ उपक्रम  

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘रक्षक बंधन’ या उपक्रमाचा आज (ता. २७ ) माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. 

या वेळी भाजपचे मुंबई विभागाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘रक्षक बंधन’ कार्यक्रमांतर्गत कोविड योद्धे डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलिस, मीडिया कर्मचारी आदींसाठी प्रत्येक घरांतून दोन दोन राख्या आणि कृतज्ञता व्यक्त करणारी पत्रे जमा करून पोचविण्यात येतील. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक वॉर्डमध्ये भाजपतर्फे या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक पोलिस ठाणे, स्थानिक रुग्णालय, सफाई चौकी, माध्यमांचे कार्यालय अशा ठिकाणी हा रक्षक बंधन कार्यक्रम करण्यात येईल. त्याचबरोवबर सीमेवर तैनात जवानांसाठी जनतेच्या कृतज्ञेच्या भावना राखीच्या माध्यमातून पोचविण्यासाठी देखील याच ‘रक्षक बंधन’ राख्या जमा करण्यात येणार आहेत. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख