३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उघड

अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळात येणाऱ्या ३२०० जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३२ जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. विधानभवन येथे चाचण्या केलेल्यांपैकी एका आमदारालाही कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra Legislative Assembly
Maharashtra Legislative Assembly

मुंबई : अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळात येणाऱ्या ३२०० जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३२ जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. विधानभवन येथे चाचण्या केलेल्यांपैकी एका आमदारालाही कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाचा प्रसार वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. विधीमंडळात ज्यांना यायचे आहे, अशा सर्वांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. हे अधिवेशन दोन आठवडे चालणार आहे. त्यामुळे दोन वेळा सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे ३२०० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ३२ जण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. यात दोन पत्रकारही कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत.

बहुतांश आमदारांनी खासगी लॅबमध्ये कोरोना चाचण्या केल्या. त्यामुळे त्यांचा डाटा तूर्तास उपलब्ध झालेला नाही, असे विधानभवनातून सांगण्यात आले आहे. आमदार, विधीमंडळ कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा यंत्रणा व प्रसार माध्यमे अशा सर्वांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होता.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com