दहा बाय दहाच्या घरात राहणारे तेरा हजार मुंबईकर मुळगावी परतले ! 

सार्वजनिक शौचालयाचा वापर सामान्य तसेच कोरोनाबाधित कुटुंबीयांना एकत्रित करावा लागत असल्याने नागरिकांच्या मनात भीती आहे.
दहा बाय दहाच्या घरात राहणारे तेरा हजार मुंबईकर मुळगावी परतले ! 

मुंबई : डोंगराळ भाग त्यात दाटीवाटीने वसलेल्या असंख्य झोपड्या... दहा बाय दहाच्या घरात 6 ते 7 जणांचे कुटुंब... 250 ते 300 झोपड्यांसाठी 10 आसनी शौचालय...

त्यात कोरोनाचा शिरकाव या भीतीने घाटकोपर खंडोबा टेकडी डोंगराळ भागातील सुमारे 13 हजार घाटकोपरवासी आपापल्या गावी गेले आहेत. 

महाड, माणगाव, पोलादपूर, खेड, दापोली, रत्नागिरी, अलिबागमधील अनेक कोकणपट्ट्यातील लोक घाटकोपर पूर्व आणि पश्‍चिमेकडील डोंगराळ भागात राहतात.

जगभरात कोरोनाचे थैमान आणि मुंबईत सतत वाढत असणारा कोरोनाबाधितांचा आकडा पाहून नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेला लॉकडाऊन अद्यापही सुरू आहे. 

झोपड्यात कोरोनाने शिरकाव केल्याने सार्वजनिक शौचालयामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. लॉकडाऊन त्यात झोपड्यांतही कोरोना रुग्ण सापडत असल्याने दहा बाय दहाच्या खोल्यांमध्ये प्रत्येक कुटुंबाला स्वतःला क्वांरटाईन करून घेणे अवघड जात आहे. 

मुंबईच्या या रहाटगाड्यात जीव मुठीत धरून राहावे लागत असल्याने अनेक जण "गड्या आपला गावच बरा' म्हणत कोकणात गेले आहेत.  
महात्मा फुले योजनेंतर्गत सर्वांनाच उपचाराचा लाभ

सर्वांनाच उपचाराचा लाभ 
राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन "महात्मा फुले जन आरोग्य' योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला.

करोनाबाधित रुग्ण तसेच करोनाची लागण नसलेल्या राज्यातील 12 कोटी नागरिकांना या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेस समाविष्ट असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. 

आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार सरकारी व पालिका रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्यामुळे सरकारी व पालिका रुग्णालयांमध्ये गुडघ्यावरील शस्त्रक्रिया व अन्य 102 उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ यापुढे जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे. 

महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 996 आजारांवरील उपचाराची सोय असून पंतप्रधान जीवनदायी योजनेत 1209 आजारांवर उपचार केले जातात. राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com