मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या तपासादरम्यान अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा समोर आला होता. त्यांना बॉलीवूड कलाकारांसह अनेकांची चौकशी करण्यात आली. अनेक दिवसांपासून शोध सुरू असलेला सुशांतचा मित्र व सहायक दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला अंमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) ताब्यात घेतले आहे. सुशांतला अंमली पदार्थ पुरवत असल्याचा त्याच्यावर संशय आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडचे अंमली पदार्थांच्या तस्करीशी असलेले संबंध पुढे आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर एनसीबीकडून अनेकांची तपासणी करण्यात आली. अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या चौकशीदरम्यान एका आरोपीने ऋषिकेश पवारचे नाव घेतल्याचे समजते. तो सुशांतला अंमली पदार्थ पुरवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
Narcotics Control Bureau (NCB) has detained Sushant Singh Rajput's friend, assistant director Rishikesh Pawar, for questioning: NCB. #Maharashtra
— ANI (@ANI) February 2, 2021
या प्रकरणात ऋषिकेशचा शोध घेतला जात होता. त्याला चौकशीसाठी समन्सही पाठविण्यात आले होते. पण त्यानंतर तो चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे त्याच्या घराची झडती घेण्यात आली. एनसीबीला त्याच्या घरातील लॅपटॉपमध्ये काही संशयित माहिती मिळाली होती. अटक होण्याच्या भितीने ऋषिकेशने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. अखेर मंगळवारी त्याला एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.
अंमली पदार्थ प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक कऱण्यात आले आहे. त्यामध्ये बहुतेक जण अंमली पदार्थांची तस्करी करणारे आहेत. तसेच एनसीबीने दीपिका पदुकोण, सारा अली खान, अर्जुन रामपाल, श्रध्दा कपूर यांच्यासह अनेक कलाकारांची चौकशीही केली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. दोघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्जच्या अँगलचा तपास करणाऱ्या अमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली होती. दोघेही सध्या जामिनावर बाहेर आहेत.
Edited By Rajanand More

