वसईकरांची तहान भागणार, बहुजन विकास आघाडीच्या प्रयत्नांना यश

हे धरण पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेनंतर स्वतःच्या मालकीचे धरण असलेली वसई-विरार दुसरी तर पालघर जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे.
वसईकरांची तहान भागणार, बहुजन विकास आघाडीच्या प्रयत्नांना यश

विरार : वसई विरार महापालिकेच्या मालकीच्या खोलसपाडा टप्पा 2 धरणाच्या कामला लवकरच सुरुवात होणार असून दोन वर्षात ते धरण पूर्ण करण्याचे ध्येय लघुपाटबंधारे विभागाने ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात वसई विरारकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. आमदार हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडी यांच्या प्रयत्नांनी हे धरण होत आहे.

हे धरण पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेनंतर स्वतःच्या मालकीचे धरण असलेली वसई-विरार दुसरी तर पालघर जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे. यासंदर्भात नुकतीच लघुपाटबंधारे विभाग आणि पालिका आयुक्त यांच्यात बैठक झाल्याने या कामाला वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

वसई विरारकराना पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून आमदार ठाकूर सतत प्रयत्न करत आले आहेत. त्यांच्या कार्यकाळात प्रथम सूर्या धरणामुळे वसई विरारची पाणी टंचाई काही प्रमाणात कमी झाली. परंतु शहराची वाढती लोकसंख्या भविष्याचा अंदाज घेत त्यांनी पालिकेच्या मालकीच्या देहरजी धरणासाठी काम हाती घेतले आणि ते सुद्धा प्रगती पथावर आहे. तर आता पालिकेच्याच मालकीच्या खोलसपाडा टप्पा 2 धरणाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. 

शहरापासून अवघ्या 14 किलोमीटर लांब असलेल्या या धरणासाठी लागणाऱ्या परवानग्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. वनविभागाच्या दोन पैकी एक परवानगी मिळाली असून दुसरी परवानगीही लवकरच मिळणार असल्याचे नगरसेवक आणि या योजनेचा पाठपुरावा करणारे प्रफ्फुल साने यांनी सांगितले. 

वनविभागाला जागा आणि झाडांची किंमत म्हणून 11 कोटी रुपये भरल्यावर येत्या दोन महिन्यात या कामाला सुरुवात होईल. खोलसापाडा हे 51 कोटी रुपये खर्चाचे धरण 36 हेक्टर जागेवर होणार असून यातून रोज 15 mld  इतका पाणीपुरवठा होणार आहे.

सद्या पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणापेक्षा हे धरण दीड पट मोठे असेल. यासंदर्भात पालिका आणि लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या असून वनविभागाबरोबर पुढील बैठका लोकरच होतील.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com