...अन्यथा कोरोनाची दुसरी लाट; टास्क फोर्सच्या सदस्य मनीषा म्हैसकर यांचा इशारा

अवघे जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे धास्तावलेले आहे. आपण आतापर्यंत ही लाट रोखण्यात यशस्वी झालो आहोत; मात्र निष्काळजीपणे वागलो, तर आपल्यालाही तिचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा राज्य टास्क फोर्सच्या सदस्य मनीषा म्हैसकर यांनी दिला आहे.
Maharashtra Task Force warns second spell of Corona
Maharashtra Task Force warns second spell of Corona

मुंबई  : अवघे जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे धास्तावलेले आहे. आपण आतापर्यंत ही लाट रोखण्यात यशस्वी झालो आहोत; मात्र निष्काळजीपणे वागलो, तर आपल्यालाही तिचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा राज्य टास्क फोर्सच्या सदस्य मनीषा म्हैसकर यांनी दिला आहे.

म्हैसकर यांनी कोरोना लाटेसंदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी सांगितले, की सहा महिन्यांनंतर मुंबईतील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्‍यावर आहेच. अवघे जग या दुसऱ्या लाटेमुळे धास्तावले आहे. आपण यापासून लांब असलो, तरी हा धोका टळलेला नाही. दुसरी लाट आली, तर मात्र इतरांना दोष देता येणार नाही. त्यासाठी स्वत: जबाबदार असू, असेही मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.

जून-जुलैमध्ये नागरिकांनी फार चांगला प्रतिसाद दिला. सरकारी नियमांचे पालन केले; मात्र ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये नेमकी उलटी परिस्थिती दिसत आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा दिसला, नागरिक आत्मसंतुष्ट दिसले; मात्र हीच वर्तणूक घातक ठरू शकते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आमंत्रण मिळणार आहे. तेव्हा आत्मसंतुष्ट होऊ नका, नियमांचे पालन करा, असे आवाहनही म्हैसकर यांनी केले.

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी 'थ्री सी'चे नियम पाळणे आवश्‍यक असल्याचेही त्या म्हणाल्या. 'क्‍लोज स्पेस', 'कन्फर्म स्पेस' आणि 'क्राऊडेड स्पेस' टाळायचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यासह आपल्याला मास्क घालण्याची सवय करायला हवी. बेजबाबदारपणा सोडायला हवा. लस येत नाही, तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.

सवलतींचा मोह टाळा
अनलॉक ४ नंतर आता अनेक व्यवसाय सुरू झाले आहेत. अनेक मनमोहक सवलती आपल्याला बघायला मिळत आहेत. खास करून सलून आणि ब्युटीपार्लरमध्ये अनेक आकर्षक सवलती आहेत. मात्र हा मोह आपण टाळायला हवा, असे आवाहन मनीषा म्हैसकर यांनी केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com