Breaking - सरकारी कार्यालयातील 'लेट लतिफांना' शासनाची चपराक

राज्यातल्या सरकारी कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासनाने काढलेल्या नव्या आदेशानुसार आता महिन्यातून दोनच दिवस उशीरा येण्याची मुभा सरकारी कर्मचारी -अधिकाऱ्यांना असणार आहे.
State asks Government Employees to Come on Time for work
State asks Government Employees to Come on Time for work

मुंबई : राज्यातल्या सरकारी कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासनाने काढलेल्या नव्या आदेशानुसार आता महिन्यातून दोनच दिवस उशीरा येण्याची मुभा सरकारी कर्मचारी -अधिकाऱ्यांना असणार आहे.

या आधी राज्य सरकारने मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ड्रेस कोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी, नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई करण्यात आली आहे. राज्यातील सर्व सरकारी कार्यालयात काम करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेहरावाकडे लक्ष देण्यास सरकारने सुरवात केली आहे. याचाच भाग म्हणून कर्मचाऱ्यांना जीन्स, टी-शर्ट आणि स्लीपर घालण्यास बंदी करण्यात आली आहे. कार्यालयात येताना या गोष्टी त्यांना टाळाव्यात, असा आदेशच सरकारने दिला आहे. राज्य सरकारने याबाबत परिपत्रक काढले आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याचे निर्देश सरकारने दिले आहेत. 

सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार, गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्रे असलेले कपडे घालू नयेत. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स आणि टी-शर्टचा वापर कार्यालयात टाळावा. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच शक्‍यतो चपला, सॅन्डल, शूजचा वापर करावा. पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शूज आणि सॅन्डलचा वापर करावा. कार्यालयामध्ये स्लिपरचा वापर करू नये. याचबरोबर परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी. 

सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिधान केलेला पेहराव व्यवस्थित असावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊजर पॅंट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्‍यकता असल्यास दुपट्टा असा पेहराव करावा. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्यांचा वापर करावा, असा आदेश राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी काढला आहे.

त्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याची सक्ती करण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार उशिरा येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कारवाई होणार आहे. एका महिन्यात फक्त दोन वेळा दीड तास उशिरा येण्याची मुभा अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस उशिरा आल्यास  गैरहजेरी लावली जाईल किंवा उपलब्ध रजेतून रजा वजा होणार आहे. नऊ आणि त्यापेक्षा जास्त दिवस उशिरा आल्यास वेतन कपात होणार आहे. 

रेल्वे विस्कळीत किंवा इतर घटना आकस्मित घटना घडल्यास त्याची खातरजमा करून निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com