#SSRSuicide : My salute to Mumbai Police; Criticism of Bihar DGP | Sarkarnama

#SSRSuicide : मुंबई पोलिसांना माझा सलाम; बिहारच्या डीजीपींची तिरकस टीका 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

"चौतीस वर्षांचा एक हसमुख तरुण, ज्याच्याकडे संपत्ती होती, पैसा होता आणि नावही होते. असा तरुण कोणतेही कारण नसताना गळफास घेऊन मरतो आणि गेल्या 50 दिवसांपासून सुरू असलेली चौकशी कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोचू शकत नाही, अशा जगातील सर्वोत्तम पोलिसांना मी सलाम करतो,'' अशा शब्दांत बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर हल्लाबोल केला. 

मुंबई : "चौतीस वर्षांचा एक हसमुख तरुण, ज्याच्याकडे संपत्ती होती, पैसा होता आणि नावही होते. असा तरुण कोणतेही कारण नसताना गळफास घेऊन मरतो आणि गेल्या 50 दिवसांपासून सुरू असलेली चौकशी कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोचू शकत नाही, अशा जगातील सर्वोत्तम पोलिसांना मी सलाम करतो,'' अशा शब्दांत बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर हल्लाबोल केला. 

एका हिंदी वृत्तवाहिनीवर अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि मुंबई पोलिसांचा तपास या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्या चर्चेत बोलताना पांडे यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या चर्चेत शिवसेनेचे खासदार संजय राऊतही सहभागी होते. त्यात राऊत यांनी "ज्या दिवशी मुंबई पोलिसांना बिहार पोलिसांकडून मार्गदर्शन घ्यावे लागेल, त्या दिवशी मुंबई पोलिस बंद करावे लागेल,' असा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पांडे यांनी मुंबई पोलिसांवर तिरकस टीका केली. 

राऊत यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही. त्यामुळे गैरसमज निर्माण होतील, असे म्हणून त्यांनी मुंबई पोलिसांवर टीका केली. 

पांडे म्हणाले की, मुंबई पोलिस हे सुप्रीम आहे, सुपर आहे. जगात मुंबई पोलिस सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ आहे. अमेरिका, ब्रिटीश आणि कॅनडा पोलिसांपेक्षाही मुंबई पोलिस चांगले आहेत. मात्र, सुशांतसिंह याच्याकडे नावलौकीक, पैसा आणि संपत्ती सर्व काही होते. असे असतानाही सुशांतसिंह गळफास घेऊन मरतो आणि गेल्या 50 दिवसांपासून चौकशी करणारे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचू शकत नाहीत, अशा पोलिसांना माझा सलाम! यावर मला काही बोलायचे नाही. 

कोणत्याही राजकारण्याचे नाव समोर आलेले नाही : पोलिस आयुक्तांचा खुलासा
 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये मोठे वादळ उठले आहे. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध सुशांतचे पिता के.के. सिंह यांनीच एफआयआर दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्रातील तरुण राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आता याबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी खुलासा केला असून, कोणत्याही राजकारण्याचे नाव चौकशीत समोर आले नसल्याचे म्हटले आहे.  

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. यात त्यांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले आहेत. हा एफआयआर दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचे पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी जमा केलेले पुरावे आणि नोंदविलेले जबाबही बिहार पोलीस तपासत आहेत. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख