...म्हणून उद्धव ठाकरेंनी आठवलेंची सुरक्षा कमी केली 

प्रत्येक सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक मुद्द्यावर भूमिका घेणारे, रामदास आठवले यांना झेड सुरक्षा देणे आवश्यक असताना त्यांच्या सुरक्षेत कपात करून महाविकास आघाडी सरकारने सुड उगविला आहे.
Ramdas Athavale, Uddhav Thackeray jpg
Ramdas Athavale, Uddhav Thackeray jpg

मुंबई :  राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत रविवारी कपात केली. आठवले यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयावर आंबेडकरी जनतेच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काही समाजकंटकांनी त्यांच्या सभा दौऱ्यामध्ये दहशत माजविल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यांच्यावर अंबरनाथ येथे मागील वर्षी हल्ल्याचाही प्रयत्न झाल्याची आठवण अजून ताजी आहे. प्रत्येक सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक मुद्द्यावर भूमिका घेणारे, रामदास आठवले यांना झेड सुरक्षा देणे आवश्यक असताना त्यांच्या सुरक्षेत कपात करून महाविकास आघाडी सरकारने सुड उगविला आहे. असा, तीव्र संताप रिपब्लिकन कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

सुरक्षा कपातीच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी (ता. 12 जानेवारी) मुंबईत अनेक ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन करुन निषेध करण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी सांगितले आहे. 

शिवसेनेची साथ सोडून भाजप सोबत युती केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामदास आठवलेंवर कोत्या मनोवृत्तीतून सूड उगवीत आहेत. त्यांची ही कृती आणि मनोवृत्ती कायम राहिल्यास अशी कृती मुख्यमंत्री पदावर कलंक लावणारी ठरेल. शिवशक्ती भीमशक्ती मुळे मिळालेला जनाधार आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनाला गमवावा लागेल. असा, इशारा देऊन रिपब्लिकन मराठा आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. 

दरम्यान, इगतपुरी येथे आज आठवले यांची सुरक्षा पूर्ववत करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इगतपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती सुनील रोकडे यांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com