अबब : आतापर्यंत ६२ आमदारांना कोरोना; अधिवेशनावर सावट

राज्यात कोरोना रौद्र रूप धारण करीत असताना येत्या आज व उद्या (ता. ८) तारखेला पावसाळी अधिवेशन होणार आहे. कोरोनाच्या सावटात हे अधिवेशन होणार, हे नक्कीच आहे. पण आतापर्यंत राज्यातल्या तब्बल ६२ आमदारांना कोरोनाची बाधा झाली असल्याने हे अधिवेशन कशा पद्धतीने होणार हे पहावे लागणार आहे. यापैकी काही जण कोरोना मुक्त झाले आहेत
Sixty Two MLA's Corona Positive Till Date
Sixty Two MLA's Corona Positive Till Date

मुंबई :  राज्यात कोरोना रौद्र रूप धारण करीत असताना येत्या आज व उद्या (ता. ८)  तारखेला पावसाळी अधिवेशन होणार आहे. कोरोनाच्या सावटात हे अधिवेशन होणार, हे नक्कीच आहे. पण आतापर्यंत राज्यातल्या तब्बल ६२ आमदारांना कोरोनाची बाधा झाली असल्याने हे अधिवेशन कशा पद्धतीने होणार हे पहावे लागणार आहे. यापैकी काही जण कोरोना मुक्त झाले आहेत. 

राज्य सरकारमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, शिवसेनेचे, अब्दुल सत्तार, कॉंग्रेसचे असलम शेख, अशोक चव्हाण आणि सुनील केदार यांना कोरोनाची लागण झाली होती. विधानसभेचे मकरंद पाटील राष्ट्रवादी, किशोर जोरगेवार अपक्ष, ऋतुराज पाटील काँग्रेस,  प्रकाश सुर्वे शिवसेना, पंकज भोयर भाजप, माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी, मुक्ता टिळक भाजप, वैभव नाईक शिवसेना, सुनील टिंगरे राष्ट्रवादी, किशोर पाटील शिवसेना, यशवंत माने राष्ट्रवादी, मेघना बोर्डीकर भाजप, सुरेश खाडे भाजप, सुधीर गाडगीळ भाजप,, चंद्रकांत जाधव काँग्रेस, रवी राणा अपक्ष, अतुल बेनके राष्ट्रवादी, प्रकाश आवाडे अपक्ष, अभिमन्यू पवार भाजप, माधव जळगावकर काँग्रेस, कालिदास कोलंबकर भाजप, महेश लांडगे भाजप, मोहन हंबरडे काँग्रेस, अमरनाथ राजूरकर काँग्रेस, मंगेश चव्हाण भाजप, विक्रांत सावंत जत कॉंग्रेस या आमदारांना कोरोनाची बाधा आहे. विधानपरिषदेचे सदाभाऊ खोत भाजप, सुजित सिंग ठाकूर भाजप, गिरीश व्यास भाजप आणि नरेंद्र दराडे भाजप हे आमदारही कोरोनाग्रस्त झाले होते.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, तासगाव चे आमदार सुमनताई पाटील, खानापूरचे आमदार अनिल बाबर, जतचे आमदार विक्रम सावंत, आणि मोहनराव कदम यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान विधिमंडळ अधिवेशनात एका बाकावर एक आमदार बसणार आहेत. एरवी एका बाकावर दोन बसतात. १४४ आमदारांची सभागृहात तर  १४४ आमदारांी गॅलरीत बसायची व्यवस्था करण्यात आली आहे. गॅलरीत देखील एक खुर्ची सोडून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

आज सकाळपासूनच ज्यांची टेस्ट निगेटिव आहे त्यांनाच विधान भवनामध्ये प्रवेश दिला जातोय. शनिवार आणि रविवारी विधानभवनात जवळपास दोन हजाराहून अधिक जणांची कोविड टेस्ट करण्यात आली होती. यापैकी ५८ जणांना करोणाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलय.  तर अनेक लोक प्रतिनिधी सुद्धा कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे ज्यांची टेस्ट निगेटिव आहे अशाच अधिकारी-कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना विधिमंडळात प्रवेश दिला जात आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com