वीजबिलात सवलत नाही; राज्यभर वसुली मोहीम - Shock to power distribution company customers; Statewide electricity bill recovery drive | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

वीजबिलात सवलत नाही; राज्यभर वसुली मोहीम

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

लोकप्रतिनिधींच्या मदतीने ग्राहकांना समजावून सांगून वीज बिलांची वसुली किती महत्वाचे आहे. याबाबत समजावून सांगण्यात येणार आहे. तसेच तीन वर्षांपासून थकित असलेल्या ग्राहकांकडून तातडीने बिलांची वसुली होणार आहे. तसेच शुन्य ते ३० युनिटपर्यंत विज वापर असलेल्यया ग्राहकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाणार आहे. कमी विज वापराच्या कारणांचीही माहिती घेतली जाणार आहे. 

सातारा : उच्च व लघुदाब ग्राहकांची वीजबिलांची सुमारे सात हजार कोटींची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीने राज्यभर वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे कोरोना काळातील आलेली वाढीव बिलांबाबत सवलत देण्याची शक्यता मावळली आहे. थकबाकीदार ग्राहकांना टप्प्या टप्प्याने वीजबिल भरण्याची मुभा राहणार आहे.पण तीन वर्षांपासून थकित असलेल्या ग्राहकांकडून तातडीने वसुली केली जाणार आहे. त्यासाठी विजवितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे.   

वीजबिलाची वाढलेल्या थकबाकीमुळे वीज वितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने राज्यभर वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. त्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. कोरोना लॉकडाउनच्या काळात वीजबिलांचा भरणा वेळेत न झाल्याने अनेक ग्राहकांची थकबाकी वाढली आहे. त्यावर वीज वितरणने वाढीव दराने बिले ग्राहकांना पाठविल्याने ग्राहकांत असंतोष निर्माण झाला होता.

 पण वीज कनेक्शन तोडण्याची भिती असल्याने अनेकांनी वीज बिले भरलीही. त्यामुळे कोरोना काळातील वीजबिलांना सवलत मिळण्याची  शक्यता मावळली आहे.  राज्यात उच्चदाब ग्राहकांकडील थकबाकी ९०० कोटी, घरगुती व वाणिज्यिक औद्योगिक ग्राहकांची ४८५.८ कोटी, सार्वजनिक सेवांची थकबाकी, ७२ लाख, सार्वजनिक पाणी योजनांची २१८ कोटी, पथदीपांची ७९४ कोटी थकबाकी आहे.

तर एप्रिल महिन्यापासून ६४.५२ लाख लघुदाब ग्राहकांनी वीज बिलापोटी कोणतीही रक्कम आजपर्यंत भरलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या दैनंदिन कामकाजात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात सुमारे साडे चौतीस हजार कोटींची वसुली होणे अपेक्षित होते, त्यापैकी २८ हजार कोटी रूपये वसुल झाले आहेत. महावितरणचा कॅशफ्लो सुधारण्यासाठी ग्राहकांकडून थकबाकीची वसुली करणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुली मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये ग्राहकांच्या वीजबिलांच्या तक्रारींचे निराकरण करणे, वीज बिल दुररूस्ती आणि वसुलीसाठी मेळावे घेतले जाणार आहेत. तसेच उच्चदाब ग्राहकांना टप्प्या टप्प्याने बील भरण्याची परवानगी असणार आहे. किंवा एकाच वेळी तोडगा काढून वीज बिल भरता येणार आहे. या दोन्ही बाबींचा एकाच वेळी लाभ घेता येणार आहे. शासकिय कार्यालये, शासकिय निवास, सार्वजनिक पाणी योजना व पथदीप यांची वसुली वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी थेट संबंधित कार्यालयात जाऊन वसुल करणार आहेत.

तसेच लोकप्रतिनिधींच्या मदतीने ग्राहकांना समजावून सांगून वीजबिलांची वसुली किती महत्वाचे आहे. याबाबत समजावून सांगण्यात येणार आहे. 
तसेच तीन वर्षांपासून थकित असलेल्या ग्राहकांकडून तातडीने बिलांची वसुली होणार आहे. तसेच शुन्य ते ३० युनिटपर्यंत विज वापर असलेल्यया ग्राहकांची काळजीपूर्वक तपासणी केली जाणार आहे. कमी विज वापराच्या कारणांचीही माहिती घेतली जाणार आहे. ही सर्व थकित रक्कम येत्य डिसेंबरपर्यंत वसुल करण्याचे उद्दीष्ट वीज वितरणच्या सर्व कार्यालयांना दिले आहे. 

 

   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख