सेना म्हणते....अमित शहांचा विश्वास असलेल्या 'एम्स' चा अहवाल नाकारणार का?

सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केली असा निष्कर्ष एम्सच्या तज्ज्ञ डाॅक्टरांनी काढला आहे. एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता यांनी हे सत्य समोर आणले आहे. गेल्या दोन महिन्यांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनासाठी व त्या नंतरच्या उपचारांसाठी एम्समध्ये दाखल झाले होते. हाच मुद्दा पकडून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे.
Sanjay Raut - Amit Shah
Sanjay Raut - Amit Shah

मुंबई : ''अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’ने  याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय?," असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेने 'सामना'च्या माध्यमातून भाजपला खिजवले आहे.

सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केली असा निष्कर्ष एम्सच्या तज्ज्ञ डाॅक्टरांनी काढला आहे. एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता यांनी हे सत्य समोर आणले आहे. गेल्या दोन महिन्यांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनासाठी व त्या नंतरच्या उपचारांसाठी एम्समध्ये दाखल झाले होते. हाच मुद्दा पकडून शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. "डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. ज्या एम्सवर देशाच्या गृहमंत्र्यांचा विश्वास आहे, त्या एम्सचा अहवाल नाकारणार का,'' असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. 

''बिहार निवडणुकीत प्रचाराचा कोणताही मुद्दा नसल्याने नितीश कुमार व तेथील राजकारण्यांनी हा मुद्दा उचलला. त्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर यांना वर्दीतच नाचायला लावले व शेवटी हे महाशय नितीश कुमार यांच्या पक्षात सामील झाल्याने एक प्रकारे खाकी वर्दीचेच वस्त्रहरण झाले. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास काटेकोरपणे करतच होते. सुशांतच्या पाटण्यातील कुटुंबाचा वापर स्वार्थी, लंपट राजकारणासाठी करून केंद्राने हा तपास सीबीआयकडे ज्या जलदगतीने पोहोचवला ते पाहता ‘बुलेट ट्रेन’चा वेगही मंद पडला असेल,'' असे म्हणत शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार आणि भारतीय जनता पक्षालाही आपले लक्ष्य बनवले आहे. 

काही माध्यमांनी मुंबई पोलिसांना लक्ष्य बनवले होते. त्यांच्यावरही 'सामना' ने जहरी भाषेत टीका केली आहे. सुशांत प्रकरणाचे भांडवल करून महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिसांची ‘मीडिया’ ट्रायल केली! स्वतःच पत्रकारितेतील हरिश्चंद्राचा अवतार समजणारे प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले! त्या बेइमानांच्या विरोधात मराठी जनतेने ठाम भूमिका घेतलीच पाहिजे, असे शिवसेनेने म्हटले आहे.    
Edited By - Amit Golwalkar

मुंबई शिवसेना महाराष्ट्र अमित शहा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com