राणे तुम्ही मातोश्रीवर का फोन करत होतात? विनायक राऊतांचा सवाल - Shivsena MP Vinayak Raut Hits on BJP MP Narayan Rane | Politics Marathi News - Sarkarnama

राणे तुम्ही मातोश्रीवर का फोन करत होतात? विनायक राऊतांचा सवाल

अनंत पाताडे
सोमवार, 11 जानेवारी 2021

सिंधुदुर्गातील मेडिकल काॅलेज हे देवेंद्र फडणवीसांनी नव्हे तर उद्धव ठाकरेंनी मंजूर केले. मी आता उघड करु काय कणकवलीकरांसमोर की राणे मातोश्रीवर दिवसाला दोन-दोन तीन - तीन फोन का करत होते?, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला

कणकवली: ''सिंधुदुर्गातील मेडिकल काॅलेज हे देवेंद्र फडणवीसांनी नव्हे तर उद्धव ठाकरेंनी मंजूर केले. मी आता उघड करु काय कणकवलीकरांसमोर की राणे मातोश्रीवर दिवसाला दोन-दोन तीन - तीन फोन का करत होते? हे खोटं असेल तर आई-वडिलांची शपथ घेऊन सांगाा,'' असा जोरदार हल्लाबोल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी येथे केले. 

शिवसेना मध्यवर्ती जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन राऊत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी राणे कुटुंबावर तुफान टीका केली. राणे यांच्या मेडिकल काॅलेजचा मुद्दा उपस्थित करत राऊत म्हणाले, "मी आता उघड करू का कणकवलीकराणांचा समोर? पत्रकारांच्या समोर सांगतोय जा त्या नारायण राणे यांना विचारा की दोन महिन्यांपूर्वी तुम्ही मातोश्रीवर फोन किती वेळा केले होते? कशाला फोन करता होता मोतोश्रीवर? उद्धवजी ठाकरे यांच्याशी बोलायचं आहे असे म्हणत दिवसाला तीन तीन फोन केले. खोटं असेल तर आई बाबांची शपथ घेऊन सांगा. मी सांगतो हे खरं आहे. देवेन्द्र फडणवीस यांनी राणेंना अखेर पर्यत कॉलेज दिल नाही. नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली. देवेन्द्र फडणवीस यांच्या आश्रयाला जाऊन सुद्धा कॉलेज राणेंना काॅलेज मिळाळे नाही," 

एक वर्षांपूर्वीच नारायण राणे यांचे कटर राणे समर्थक असलेले सतीश सावंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर राणे यांचा तीळपापड होत आहे, असे सांगून राऊत म्हणाले, ''तोच राग ठेवत सतीश सावंत यांची संचयनी घोटाळा प्रकरणी तक्रार करण्यासाठी राणे अनुराग ठाकूर यांच्याकडे दिल्लीला जाणार आहेत. जा की. आम्हाला माहिती नाही का की नितेश राणे यांनी नवी मुंबईच्या म्हात्रे नावाच्या इसमाला १२ कोटींचा गंडा नवी मुंबईमध्ये घातला तो? आम्हाला माहिती नाही का की निलेश राणे यांनी चिपळूणच्या संदीप सावंत यांना गाडीमध्ये घालून कसे मारत- मारत नेलं? अशोक राणेंचा खून कोणी केला हे आम्हाला माहिती आहे. मनचेकर यांच डोकं कोणी फोडलं आम्हाला माहिती नाही का? सगळी कुंडली आहे जा खुशाल दिल्लीमध्ये. या १२ कोटींच्या केसमध्ये त्यावेळी नितेश राणे याला देवेन्द्र फडणवीस तुरुंगात टाकणार होते. त्याचे वडील शरण गेले भाजपला. म्हणून ती केस थांबली,''

चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरुनही राऊत यांनी राणेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "नारायण राणे त्या दृष्टीने खूप कच्चे आहेत. विमानतळ सुरू करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात हे नारायण राणे यांना कधीच कळणार नाही. त्यांनी ते शिकून सुद्धा घेऊ नये. त्यांच्या ते अवक्याच्या पलीकडे होते ते. म्हणून तर ते मला काम पूर्ण करावं लागले. त्यामुळे राणे यांच्या बकवासगिरीला मी किंमत देत नाही चिपी विमानतळ साठी विनायक राऊत यांनी किती प्रयत्न केलेत हे जाणून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाचे पंचवीस वेळा खासदार राहिलेले राजीव प्रताप रुडी आहेत त्यांच्याकडे राणेंनी जाऊन बसावं,''
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख