महाविकास आघाडीत मोठी घडामोड : शिवसेना आमदारांना व्हीप जारी.... - shivsena issues whip to MLAs for upcoming assembly session | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

महाविकास आघाडीत मोठी घडामोड : शिवसेना आमदारांना व्हीप जारी....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 29 जून 2021

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून नाट्य रंगण्याची चिन्हे.. 

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सात जुलैपासून सुरू होत असून त्यासाठी सध्या राजकीय उठाबशा सुरू झाल्या आहेत. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, असा काॅंग्रेसचा आग्रह आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही आता त्यासाठी मान्यता दिली आहे. शिवसेनेने मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीचा व्हीप सर्व आमदारांना जारी केला आहे. (Congress insists for assembly speker election in upcoming session)

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व मंत्र्याच्याही आज स्वतंत्रपणे बैठक झाली. त्यातही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषय झाल्याचे पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर सांगितले. ही निवडणूक घेण्याची पक्षाची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीही स्वतंत्रपणे भेट झाली. त्यामुळे महाविकास आघाडीत घडामोडी सुरू असल्याची चर्चा झाली. 

ही बातमी वाचा : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकांवर बैठका कशासाठी?

तीन पक्षांनी सत्ता टिकवून दाखवावी... भाजपचं आव्हान

या साऱ्या घटनांवर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आज सायंकाळी विधीमंडळ अधिवेशनासाठी शिवसेनेने व्हीप जारी केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही. ही निवडणूक घ्यावी, असा भाजपचा आग्रह आहे. हे पद रिक्त असल्याने घटनात्मकदृष्ट्या सरकार काम करत नसल्याची तक्रार भाजपने राज्यपालांकडे केली आहे. याच निवडणुकीत घातपात होऊ शकतो, असा महाविकास आघाडीला संशय आहे. भाजपचे नेते या वर स्पष्टपणे बोलत नसले तरी संधी मिळाल्यास या निवडणुकीत महाविकास आघाडीत संकटात टाकू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

हे पद काॅंग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. या पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा आहे. चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध होऊ शकतो. अजून तीनही पक्षांच्या समन्वय समितीत संभाव्य नावाची चर्चा व्हायची आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख