अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार; सभागृहात शिवसेना आक्रमक - Shivsena Aggressive Against Arnab Goswami in Legislative Assembly | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार; सभागृहात शिवसेना आक्रमक

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाच्या सुरुवातीला शिवसेना आमदारांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार  सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला

मुंबई : पत्रकार आर्णव गोस्वामी याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत एकेरी भाषेत टीप्पणी केल्यामुळे दुखावलेले शिवसेना आमदार आज विधीमंडळच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भलतेच आक्रमक झाले.त्यांनी गोस्वामी विरोधात घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.आमदार प्रताप सरनाईक यांनी गोस्वामी विरोधात हक्क भंग प्रस्ताव दाखल केला.

अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा घणाघाती आरोप करत विधिमंडळ पावसाळी अधिवेशना दरम्यान शिवसेना हा पक्ष  सभागृहात आक्रमक झाला. 

दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाच्या सुरुवातीला शिवसेना आमदारांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार  सरनाईक यांच्याकडून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. 

यावेळी बोलताना ते म्हणाले, "अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत.''

त्यांची 'रिपब्लिक टीव्ही' ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी अशी मागणी ही यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. तर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनीही आक्रमक भाषण केले. ''अर्णव गोस्वामी स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, स्वत: खटला चालवत आहेत, स्वत: निकाल देत आहेत,'' अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी समाचार घेतला . 

''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात अशी राज्यघटना म्हणते. अर्णब स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात. असा अपमान करणाऱ्या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे. एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला, म्हणून त्यांनी काहीही करायचे का?'' असा प्रश्न ही अनिल परब यांनी उपस्थित केला. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख