अहो आश्‍चर्यम... शिवसेना - भाजपची युती झाली!  

राज्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणारे शिवसेना-भारतीय जनता पक्ष भिवंडी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीत मात्र एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेकडे महायुतीमुळे पक्षीय बलाबल जास्त असूनही शिवसेनेने भाजपशी घरोबा करत सामंजस्याने बिनविरोध निवडणूक पार पाडली.
Shiv Sena-BJP together for election of Bhiwandi Panchayat Samiti chairperson and deputy chairperson
Shiv Sena-BJP together for election of Bhiwandi Panchayat Samiti chairperson and deputy chairperson

भिवंडी : राज्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणारे शिवसेना-भारतीय जनता पक्ष भिवंडी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीत मात्र एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेकडे महाविकास आघाडीमुळे पक्षीय बलाबल जास्त असूनही शिवसेनेने भाजपशी घरोबा करत बिनविरोध निवडणूक पार पाडली. 

शिवसेने सभापतिपद आपल्याकडे ठेवले असले तरी उपसभापतिपद भाजपला सोडले आहे. सभापतिपदी शिवसेनेचे विकास अनंत भोईर यांची, तर उपसभापतिपदी भाजपचे जितेंद्र श्‍याम डाकी यांची वर्णी लागली आहे. 

शिवसेना भाजपच्या युतीमुळे दोन्ही पक्षांकडून एक एक अर्ज आला असल्याने पिठासन अधिकारी तथा तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. त्यानंतर भाजप, शिवसेनेच्या सदस्यांनी एकमेकांची गळाभेट घेऊन जल्लोष करीत शुभेच्छा दिल्या. 

भाजपचे खासदार कपिल पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी एकत्रितपणे येऊन ही विचारांची युती केल्याचे सांगितले आहे. 

भिवंडी पंचायत समितीमध्ये 42 सदस्य असून शिवसेनाकडे 20,भाजपकडे 19, कॉंग्रेस 2, मनसे 1 असे पक्षीय बलाबल आहे. त्यातच महाविकास आघाडीमुळे कॉंग्रेसचे दोन व मनसेचा एक सदस्य देखील शिवसेनेसोबत होते, त्यामुळे शिवसेनेकडे एकूण 23 सदस्य, तर भाजपकडे 19 सदस्य होते. 

मात्र, लोकसभा निवडणुकीत झालेल्या शिवसेना भाजपच्या केंद्रातील युतीमुळे स्थानिक पातळीवर त्यावेळीच शिवसेना, भाजपच्या उमेदवारांनी पंचायत समितीचा फॉर्म्युला ठरविला होता. जो आजच्या (ता. 5 जुलै) निवडणुकीत समोर आले आहे. 

राज्यात सध्या शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात दंड थोपटत उभे आहेत. भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीस, अशिष शेलार हे शिवसेनेवर तुटून पडत आहेत. शिवसेना खिंडीत गाठण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांऐवजी भाजपचे नेतेमंडळी शिवसेनेच्या मंत्र्यांना लक्ष करीत आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गावरून फडणवीस हे सरकारला त्यातही उद्धव ठाकरे यांच्यावर दररोज हल्लोबाल करीत आहेत. 

राज्यातील विरोधाचा सूर भिवंडीत मात्र दिसून आलेला नाही. राज्याच्या राजकारणाला बाजूला सारत शिवसेना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या सोयीनुसार युती करत सभापतिपदी शिवसेनेचे विकास भोईर, तर उपसभापतिपदी भाजपचे जितेंद्र डाकी यांची वर्णी लावत ही निवडणूक बिनविरोध पार पाडली. 

विशेष म्हणजे नवनिर्वाचित सभापती, उपसभापतींना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सदस्य सुरेश म्हात्रे, शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वास थळे, कुंदन पाटील, विष्णू चंदे आदींसह शिवसेना भाजपच्या वरिष्ठांनी भिवंडी पंचायत समितीच्या सभागृहात हजेरी लावली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com