बांधकाम क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील बांधकाम व्यवसायापुढील अडचणी मांडणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या व्यवसायाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
Sharad Pawar's letter to Modi regarding problems in construction sector
Sharad Pawar's letter to Modi regarding problems in construction sector

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील बांधकाम व्यवसायापुढील अडचणी मांडणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या व्यवसायाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

देशाच्या एकूण उत्पन्नात बांधकाम क्षेत्राचा वाटा मोठा आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याने पवार यांनी म्हटले आहे. 

बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या कॉन्फन्डरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) या संस्थेने 24 मे रोजी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले आहे. बांधकाम व्यवसायापुढे निर्माण झालेले प्रश्‍न या पत्रात मांडण्यात आले होते. पवार यांनी "क्रेडाई'ने पाठवलेल्या पत्राची आठवण या पत्रात करून दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम व्यवसाय पुन्हा सुस्थिर होण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालावे, आवश्‍यक उपाययोजना कराव्यात. या व्यवसायासाठी पतधोरण, कच्च्या मालाचा पुरवठा, जीएसटी या बाबत धोरण निश्‍चित करून अंमलबजावणी करण्यात यावी, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे. या क्षेत्राला विशेष निधी उपलब्ध करून देता येईल का? याचा विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे. 

पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेले हे या महिन्यातील दुसरे पत्र आहे. राज्यातील साखर उद्योग व सहकारी साखर कारखानदारांसमोरील प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी पत्र लिहिले होते. राज्यातील साखर उद्योगाच्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजनांची माहिती त्या वेळी पवार यांनी दिली होती. पवार यांचा सर्व क्षेत्रातील अनुभव आणि अभ्यास सखोल आहे. त्यामुळे या पूर्वीही वेळोवेळी पवार यांनी केलेल्या सूचनांची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली आहे. 

देशाच्या जीडीपीमध्ये बांधकाम क्षेत्राचा वाटा मोठा आहे. रोजगार देणारे मोठे व्यावसायिक क्षेत्र म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. त्यामुळे या व्यवसायासमोरील अडचणी सोडविल्या, तर नव्याने रोजगार निर्माण होण्याबरोबच या क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेक घटकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com