'मातोश्री'ला येतो असे मीच उद्धव ठाकरेंना सांगितले; शरद पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थिर आहे. त्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्याच्या पाठीशी मजबूत उभे आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठामपणे सांगितले. मातोश्रीवर येतो हे मीच उद्धव यांना सांगितले होते, असेही पवार म्हणाले
Sharad Pawar Clarifies About his meeting With Uddhav Thackeray
Sharad Pawar Clarifies About his meeting With Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थिर आहे.  त्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष त्याच्या पाठीशी मजबूत उभे आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठामपणे सांगितले. मातोश्रीवर येतो हे मीच उद्धव यांना सांगितले होते, असेही पवार म्हणाले. 

काल रात्री पवार यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. त्यापूर्वी दुपारी पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. सुमारे दीड तास ही चर्चा सुरु होती. दुपारी नारायण राणे यांनीही राज्यापालांची भेट घेतली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सरकारला कुठलाही धोका नाही, असे पवार यांनी सांगितले आहे. 

याबाबत पवार म्हणाले, "काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्ष एकत्र आहेत. तिन्ही पक्षाची भूमिका आहेया महामारीतून महाराष्ट्राला बाहेर काढायचे यासाठी सगळी ताकद लावायची हे सध्या उद्धिष्ट आहे. भगतसिंह कोशयारी राज्यपाल झाल्यापासून एकदाही भेटलो नव्हतो. त्यांनी चहासाठी दोन वेळा निमंत्रण दिले होते. त्यामुळे मी त्यांना काल भेटायला गेलो. आपण कृषीमंत्री असताना कोशियारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्या जुन्या गोष्टींबद्दल कालच्या भेटीत चर्चा झाली. मुख्यमंत्री महाराष्ट्रात चांगले काम करताहेत. तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात, अशा आशयाचे राज्यपाल बोलले,"

उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल पवार म्हणाले, ''ते आणि मी नेहमीच कामाचा आढावा घेतो. आम्ही एरव्ही बाळासाहेबांच्या स्मारकावर भेटतो. का मीच मातोश्रीला येतो, असं उद्धव ठाकरे यांना सांगितलं. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर एकदाच गेलो होतो. आता मी म्हटले मी येतो. कालच्या भेटीत आम्ही कोरोना बाबत आढावा घेतला. कोरोना काळात कशी काळजी घेतली पाहिजे याची चर्चा झाली कुठे कितीरुग्ण,मालेगाव परिस्थिती नियंत्रणात आहेपण पवासाळ्यात काय काळजी घ्यायची, रुग्ण संख्या वाढते आहे, यावर चर्चा झाली." कालच्या भेटीत (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी आणि इतर गप्पा झाल्या. राजकारणाचा विषय सध्या नाही. या काळात कोण राजकीय बोलणार? असा सवालही यांनी पवार यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com