राज्यपाल सुरक्षित; राजभवनात मात्र १७ जण कोरोना बाधित

गेल्या काही दिवसांत राजभवनातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयाकडून करण्यात पुढील तपासण्यात हाती घेतल्या गेल्या. मुंबईत वाळकेश्वर स्थित राजभवन येथे काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आले होते. या कारणाने महानगरपालिकेने राजभवन वरील अधिकारी - कर्मचारी यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे सुचवले होते
Governor Bhagatsinh Koshyare
Governor Bhagatsinh Koshyare

मुंबई : आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वतीने कळवण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांत राजभवनातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयाकडून करण्यात पुढील तपासण्यात हाती घेतल्या गेल्या. मुंबईत वाळकेश्वर स्थित राजभवन येथे काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आले होते. या कारणाने महानगरपालिकेने राजभवन वरील अधिकारी - कर्मचारी यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे सुचवले होते. त्यानुसार १०० जणांची चाचणी झालेली आहे. या चाचणीत १४ जण पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पूर्वीचे २ आणि आताचे १४ असे एकूण सध्या १६ जण तेथे बाधितआहेत. 

राजभवन परिसरात होणार अलगीकरण

राजभवन येथील कर्मचारी निवासस्थानी अलगीकरण सोयीस्कर असल्यास त्यांना तेथेच त्यांच्या व्यवस्थेनुसार अलगीकरण करण्यात येणार आहे.  तथापि राजभवन येथील प्रशासनाने जर महानगरपालिकेकडे अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या, तर तेथील कर्मचाऱ्यांचे अलगीकरण महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या केंद्रांमध्ये त्वरित केले जाणार आहे.

महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाकडून राजभवन येथे निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही वेळोवेळी केली आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी तेथे नेमण्यात आले आहेत. राजभवन येथे डॉक्टर्स व तत्सम कर्मचारी आहेत. तथापि आवश्यक वाटल्यास महापालिकेचे डॉक्टर्स व इतर कर्मचारी ही मदतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.

Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com