मुंबईच्या ७७ पोलिसांना 'रॅपिड अँटीजेन टेस्ट'मध्ये सापडला कोरोना

मुंबई पोलिस दलातील आतापर्यंत ३८०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ५४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांत राज्यातील ७२६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत राज्यातील ९८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Seventy Seven Mumbai Police Found Corona Positive in Rapid Anitgen Test
Seventy Seven Mumbai Police Found Corona Positive in Rapid Anitgen Test

मुंबई  : पोलिसांमधील कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी मुंबई पोलिस दलातील ९४ पोलिस ठाण्यांत कार्यरत असलेल्या ४५ ते ५५ वयोगटातील तीन हजार ४४५ पोलिसांची 'रॅपिड अँटीजेन टेस्ट' करण्यात आली होती. त्यातील ७७ पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यातील ९८ पोलिसांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

मुंबई पोलिस दलात २४ ते २९ जुलै या कालावधीत मुंबई प्रादेशिक विभागातील परिमंडळानुसार ४५ ते ५५ वयोगटातील पोलिसांची 'रॅपिड अँटीजेन टेस्ट' केली जात आहे. आतापर्यंत तीन हजार ४४५ पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात ३०८ अधिकारी व ३१७१ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील ७७ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक २७ पॉझिटिव्ह पोलिस पूर्व विभागातील आहेत. त्यांच्यापाठोपाठ पश्‍चिम, पूर्व व दक्षिण विभागातील अनुक्रमे २१, १७ व १२ पोलिसांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

चार दिवसांत ७२६ पोलिसांना लागण

मुंबई पोलिस दलातील आतापर्यंत ३८०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ५४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांत राज्यातील ७२६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, तर आतापर्यंत राज्यातील ९८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

५० टक्के बाधित होते कंटेन्मेंट झोनमध्ये कर्तव्यावर
मुंबई पोलिस दलातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेत त्यामागील कारण शोधण्यासाठी अभ्यास करून एक अहवाल बनवण्यात आला. अहवालानुसार ५० टक्के कोरोनाबाधित पोलिस कंटेन्मेंट झोन परिसरात कर्तव्य बजावत होते, अथवा त्यांचे कार्यालय त्या परिसरात होते. ४५ टक्के मृत पोलिस कंन्टेन्मेट झोन अथवा आसपासच्या परिसरातील राहणारे होते. उर्वरित पोलिसांमध्ये आजार उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या आजारपणांची लक्षणे आढळून आली आहेत.

४५ ते ५५ वयोगटांना सर्वाधिक धोका
मुंबई पोलिस दलातील ४० ते ५० वर्ष वयोगटातील बाधित पोलिसांची संख्या २२ टक्के आहे, तर ५० वर्षांवरील कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण १७ टक्के आहे. मुंबई पोलिस दलात ३१ ते ४० वर्ष वयोगटातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या सर्वाधिक असली तरी, ८२  टक्के मृत पोलिस ५० वर्षांवरील आहेत. यातील ४५ ते ५५ वयोगटातील पोलिसांना धोका सर्वाधिक असल्याने हे 'रॅपिड अँटीजेन डिटेक्‍शन टेस्ट' शिबिर घेण्यात आले होते.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com