समाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय, मविआ ‘छे आपडा’ ; भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये ट्विटरवर रंगली जुगलबंदी

केशव उपाध्ये यांनी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’असे म्हणत, ठाकरे सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे सचिन सावंत यांनीसुद्धा यांनी ‘उघड डोळे बघ नीट केशवा, तुझा शब्दच्छल आहे फसवा, असे म्हणत काव्यमय शैलीत उपाध्ये यांना उत्तर दिले आहे.
Sachin Sawant, Keshav Upadhye,
Sachin Sawant, Keshav Upadhye,

मुंबई : बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50 टक्के सवलत देण्याचा प्रस्वाव मंजूर केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर भाजपने टीका केली आहे. ट्विटरवर तर खास काव्यात्मक शैलीमध्ये एकमेकांवर प्रहार केले जात आहेत. उत्तर-प्रत्युत्तराची जुगलबंदी केशव उपाध्ये आणि सचिन सावंत यांच्यात रंगली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’असे म्हणत, ठाकरे सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीसुद्धा यांनी‘उघड डोळे बघ नीट केशवा, तुझा शब्दच्छल आहे फसवा, असे म्हणत काव्यमय शैलीत उपाध्ये यांना उत्तर दिले आहे.

केशव उपाध्ये काय म्हणाले होते. 
 
सरकार कंत्राटदार, आणि विकासक धार्जिणे आहे. राज्यातील नागरिकांच्या नशिबी कोंडा आला असून कंत्राटदारांना मात्र मणीहार घातला जातोय, असं उपाध्ये यांनी काव्यमय शैलीत म्हटलं आहे. तसेच ‘उद्धवा अजब तुझे सरकार’असे म्हणत त्यांनी मंत्र्यांच्या गाड्यंना सरकार पैसे देते. कंत्राटदारांची बिले द्यायला सरकारकडे पैसै आहेत. मात्र, मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत मिळत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नसल्याची, टीका केली आहे. 
इथे नागरिकांच्या नशिबी कोंडा
कंत्राटदांराना मणीहार
उध्दवा अजब तुझ सरकार
गोरगरीब जनता इथे उपाशी
बिल्डरांना मात्र मणीहार
उध्दवा अजब तुझे सरकार
अशी काव्यमय टिका उपाध्ये यांनी केली. 

सचिन सावंत काय म्हाणाले. 

केशव उपाध्ये यांनी टीकेला उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केशव उपाध्ये यांना ‘केशवा’असे संबोधून शब्दच्छल फसवा असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे सरकार अजब नसून, गजब आहे असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेला रोजगार देणार आहे. या सरकारमुळे जनता समाधानी आहे. जनतेच्या मनात महाविकास आघाडीचे सरकार आपले असल्याची भावाना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी खास गुजराती भाषेचा वापर करुन जनता ‘समाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय मविआ छे आपडा’असं म्हटलंय. तसेच, शेवटी मोदी सरकारमुळे देशातील करोडो लोक बेरोजगार झाल्याचा आरोपही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. 

उघड डोळे बघ नीट केशवा,
तुझा शब्दच्छल आहे फसवा
अरे अजब नव्हे, गजब आहे हे सरकार,
नाठाळांच्या माथी धोंडा अन्
जनतेला मणिहार
मोदी कृपेने करोडो झाले बेरोजगार
भाजपासाठी बिल्डर असे मलिदा, आमच्यासाठी बांधकाम क्षेत्र जनतेला रोजगार
समाधानी आज राज्यातला बापडा,
म्हणतोय, मविआ ‘छे आपडा’
सचिन सावंत आणि केशव उपाध्ये यांच्यातील ही जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com