Sanjay Raut's warning to BJP, 'This is Maharashtra, not Madhya Pradesh!' | Sarkarnama

संजय राऊतांचा भाजपला इशारा, 'हा महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश नाही!' 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 12 जुलै 2020

कोणताही मुहूर्त काढा, आमचे सरकार पाच वर्ष चालणारच, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हा मध्य प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे,  अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे. 

मुंबई : राज्यातील शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या मुद्यावर, "हा महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश नाही,' अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देत भारतीय जनता पक्षाला इशारा दिला. 

राऊत म्हणाले की, कोणताही मुहूर्त काढा, आमचे सरकार पाच वर्ष चालणारच, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हा मध्य प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे, असे ते म्हणाले. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, राज्यपालांचा परीक्षा घेण्याचा आग्रह चुकीचा असल्याचे नियतीने दाखवून दिले आहे. राज्यपालांनी परीक्षेच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. देशात, राज्यात गंभीर परिस्थिती आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना संकटात टाकायचे का, असा सवाल संजय राऊत यांनी या वेळी उपस्थित केला आहे. 

ते म्हणाले की, हे ईश्‍वराने दिलेले संकेत आहेत आणि राज्यपाल धर्म, संस्कृती, ईश्‍वर यांना मानणारे आहेत. तसेच, कोणताही मुहूर्त काढा, आमचे सरकार पाच वर्ष चालणारच, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हा मध्य प्रदेश नाही, महाराष्ट्र आहे, असा इशारा राऊत यांनी यावेळी भाजपला दिला. 

विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नका : सामंत 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षा घेणे किती धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. राज भवनातील जवळपास 18 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याच पार्श्‍वभूमीवर सामंत यांनी ट्विटवरून मत व्यक्त करताना परीक्षा घेण्यासाठी वातावरण सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. "राज भवनात कोरोना... अमिताभजींना कोरोना...' अशा सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहोचू शकला. आता तरी एचआरडी आणि यूजीसीला पटेल का? की परीक्षा घेणे म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे आहे. आता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का, असा सवाल उच्च शिक्षण मंत्री सामंत यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे. 

Edited By : Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख