संजय राऊतांच्या राज ठाकरे यांना हटके शुभेच्छा! 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (ता. 14) वाढदिवस. त्यानिमित्त राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते आणि विविध पक्षातील कार्यकर्ते, नेतेमंडळींकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. या सर्व शुभेच्छांमध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे वेगळ्याच्या अंदाजात ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
 Sanjay Raut's give the birthday wishes to Raj Thackeray!
Sanjay Raut's give the birthday wishes to Raj Thackeray!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज (ता. 14) वाढदिवस. त्यानिमित्त राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते आणि विविध पक्षातील कार्यकर्ते, नेतेमंडळींकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. या सर्व शुभेच्छांमध्ये शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे वेगळ्याच्या अंदाजात ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. 

संजय राऊत यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, "वाद-वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले...असे व्यंग्यचित्रकार...रसिक मनाचे राजकारणी श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... जय महाराष्ट्र!' अशा शब्दांत मैत्रीचा दाखल देत राऊत यांनी राज यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांची संजय राऊत यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. राज यांनी शिवसेनेतून बाहेर पडू नये, यासाठी त्या वेळी संजय राऊत यांनी पडद्याआडून जोरदार प्रयत्न केले होते. पण त्यात त्यांना यश आले नव्हते. शेवटी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांची मैत्री टिकून आहे. 

शिवसेना नेते म्हणून संजय राऊत यांनी सामनातून राज ठाकरे यांच्या भूमिकेवर अनेकदा जाहीर टीकाही केली आहे. अगदी परवाचा निर्णय म्हणजे लॉकडाउनमध्ये मनसेने दारुविक्री सुरू करण्याची मागणी केली होती, त्या वेळी संजय राऊत यांनी सामनात "वाईन, डाईन आणि फाईन...व्वा! राज बाबू' अशा मथळ्याचा अग्रेलख लिहून राज ठाकरे यांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत हल्ला केला होता. पण त्याचबरोबर अनेकदा राऊत यांनी राज यांची पाठराखणही केलेली आहे. ईडीने राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्या वेळी संजय राऊत यांनी त्यांना उघडपणे पाठिंबा दर्शविला होता. 
 

नांदगावकर म्हणतात, 'माझी ओळख राजनिष्ठ' अशीच... 

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी सुदामा आणि कृष्ण यांच्या मैत्रीचा उल्लेख केला आहे. 'सुदामाचे राजधन' ही पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. 

बाऴा नांदगावकर आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "सुदामा ची ओळख ही जगाला कृष्णप्रेमा मुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजून ही देत असतात. सुदामा कडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी "निष्ठा" जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख "राजनिष्ठ" अशीच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com