महाराष्ट्र भाजपकडून दोन अपेक्षा आहेत, एव्हढं कराच : संजय राऊत - Sanjay Raut Challenges BJP on Belgaum corporation result | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोकणासाठी मोठी बातमी : चिपी विमानतळाचा मार्ग मोकळा, DGCE चा परवाना. 9 ऑक्टोबरला उद्घाटन आणि त्याच दिवसापासून प्रवाशी वाहतूक
पंजाबमधील राजकारण पेटले : मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांचा राजीनामा; नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता

महाराष्ट्र भाजपकडून दोन अपेक्षा आहेत, एव्हढं कराच : संजय राऊत

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 8 सप्टेंबर 2021

महाराष्ट्रात विलीन होण्याबाबत बेळगाव पालिकेत दोन ओळींचा ठराव मंजूर करा, अशी सूचना राऊत यांनी केली आहे. 

मुंबई : "महाराष्ट्र भाजपाने (BJP) फालतू गप्पा मारू नयेत. बेळगाव (Balgaum) महाराष्ट्राचेच आहे की नाही एवढेच त्यांनी आज स्पष्ट करावे. तो कुणाचा काय अहंकार हे नंतर बघू. मराठी एकजुटीचा बेळगावात विजय झालाच पाहिजे, असे बोलणे हा अहंकार की मराठी अस्मिता हे 11 कोटी मराठी जनतेलाच ठरवू द्या,`` अशा शब्दांत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इशारा दिला आहे.

बेळगाव महापालिकेतील विजयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी आता भाजपला आव्हान दिले आहे.   

"महाराष्ट्र भाजपा कडून दोन अपेक्षा आहेत:
1)बेळगावातील विजयी मराठी उमेदवारांना मुंबईतील हुतात्मा स्मारकासमोर डोके टेकून महाराष्ट्र अस्मितेची शपथ घ्यायला लावा 
2)बेळगाव पालिकेत महाराष्ट्रात विलीन होण्याबाबत दोन ओळींचा ठराव मंजूर करा.. आहे मंजूर?
अहंकार बाजुला ठेवुन हे एवढे कराच!" अशा सूचना त्यांनी भाजपला दिल्या आहेत. 

या महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर  संजय राऊत यांनी संताप व्यक्त करतांना त्यांनी 'आज महाराष्ट्रात मराठी माणूस हरला म्हणून पेढे वाटले जातायत. ही नादानी आहे. इतकी गद्दारी कुणी केली नव्हती. याचे दुर्देव वाटतंय. लाज नाही वाटत का? पेढे वाटताना, जल्लोष करतांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

हेही वाचा : गजेंद्र पाटलांना आज पुन्हा ईडीनं पुन्हा बोलावलं!

या टिकेला उत्तर देतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ``बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत मराठी माणसाचा पराभव झाला नसून  संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. बेळगावमध्ये निवडून आलेल्या सदस्यापैकी १५ सदस्य मराठी आहेत. मराठी माणसाचा पराभव होवू शकत नाही.``

फडणवीस यांच्या टिकेनंतर राऊत यांनी लगेच आव्हान देणारे ट्विट केले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख