लाॅकमधल्यांकडून पत्र लिहून घेऊन सरकार अस्थिर करण्याचा डाव - Sanjay Raut Accuses BJP to Destabilize Maharashtra Government | Politics Marathi News - Sarkarnama

लाॅकमधल्यांकडून पत्र लिहून घेऊन सरकार अस्थिर करण्याचा डाव

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

एनआयएच्या लाॅकअपमध्ये असलेल्या कडून पत्र लिहून घेऊन महाराष्ट्रातले सरकार अस्थिर करण्याचा डाव विरोधी पक्ष खेळत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पण महाराष्ट्रात अशा प्रकारे दबावाचे राजकारण यशस्वी होणार नाही आणि सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, असेही राऊत म्हणाले.

मुंबई : एनआयएच्या NIA लाॅकअपमध्ये असलेल्या कडून पत्र लिहून घेऊन महाराष्ट्रातले Maharashtra सरकार अस्थिर करण्याचा डाव विरोधी पक्ष खेळत असल्याचा आरोप शिवसेना Shivsena खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केला आहे. पण महाराष्ट्रात अशा प्रकारे दबावाचे राजकारण यशस्वी होणार नाही आणि सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, असेही राऊत म्हणाले. Sanjay Raut Accuses BJP to Destabilize Maharashtra Government

परिवहन मंत्री अनिल परब Anil Parab यांच्यार आरोप करणारे एक पत्र सचिन वाझेने काल लिहिले आहे. त्यावरुन राज्यात नवा राजकीय गदारोळ सुरु झाला आहे. या पत्रात अजित पवार Ajit Pawar, अनिल देशमुख Anil Deshmukh, शरद पवार Sharad Pawarयांचीही नावे वाझेने लिहिली आहेत. त्याबाबत प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण कुठचाही राज्यात देशात कधीच झाली नव्हते. अनिल परब, अजित पवार, अनिल देशमुख यांचे नाव जी व्यक्ती लाॅकअपमध्ये आहे  त्याच्याकडून लिहून घेतली जात आहेत. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना चांगला ओळखतो. अशा पद्धतीची कुठलीच काम ते करत नाहीत. 

कोणीही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांची खोटी शपथ घेत नाही. महाराष्ट्रात विरोधी पक्ष एनआएसाठी रेड कार्पेट अंथरत आहे,"राऊत पुढे म्हणाले, "महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरू आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत काही लोकांचा या संदर्भात काम सुरू असतं. मात्र काही झालं तरी सरकार अस्थिर होणार नाही. मात्र ते अस्थिर करणाऱ्यांचा चेहरा समोर येतोय. जेलमध्ये बसलेल्या कडून चिठ्ठी लिहून घेत ते प्रसिद्ध करत सरकार विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करण्याची फॅशन आली आहे. ," Sanjay Raut Accuses BJP to Destabilize Maharashtra Government

देशाच्या संपूर्ण राजकारणामध्ये कधीच घडलं नव्हतं फक्त कॅरेक्टर वर बोट ठेवून बोलायचं. त्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर करायचा आपल्या पक्षाच्या आयटीसेल चा वापर करायचा, असे सुरु असल्याचेही ते म्हणाले. "त्या पत्राची सत्यता काय हे कोणी सांगू शकत नाही. ते पत्र लिहिणारी व्यक्ती किती संत महात्मा आहे, याबद्दल विरोधी पक्षांनी स्पष्ट करावं.जेलमध्ये अशी अनेक मंडळी आहेत त्यांच्याकडूनही पत्र लिहून तुम्हालाही अडचणीत आणू शकतो हे लक्षात घ्या.  प्रत्येक परिस्थितीशी आणि बेडरपणे सामना करून संकट पळवून लावू. कोण कोणाच्या हातात हात घालून काम करत आहे हे यातून स्पष्ट होते. पण तुम्ही कितीही अडथळे निर्माण केले, पुराव्यांचे कितीही खोटे पर्वत उभे केले तरी आम्ही ते भेदून पुढे जाऊ,'' असेही राऊत म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख