कोरोनाच्या उपचारांसाठी सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल - Sachin Tendulkar Admitted to Hospital for Corna | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

कोरोनाच्या उपचारांसाठी सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

गेल्या आठवड्यात कोरोना पाॅझिटिव्ह आलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर डाॅक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल आहे. आपण लवकरच सुखरुप घरी परतू असा दिलासा त्याने आपल्या चाहत्यांना दिला आहे. स्वतः सचिननेच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे

मुंबई : गेल्या आठवड्यात कोरोना पाॅझिटिव्ह आलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर डाॅक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल आहे. आपण लवकरच सुखरुप घरी परतू असा दिलासा त्याने आपल्या चाहत्यांना दिला आहे. स्वतः सचिननेच ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. Sachin Tendulkar Admitted to Hospital for Corona

आज भारत क्रिकेट वर्ल्डकप जिंकला त्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दिवशी सचिनने रुग्णालयात दाखल होण्याने त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. आपण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे सचिनने २७ मार्चला ट्वीटरवरुन जाहीर केले होते. सौम्य लक्षणे दिसल्यानंतर चाचणी करुन घेतली तेव्हा आपण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळले असे त्याने सांगितले होते. 

सचिनने आपल्या ट्वीटमध्ये चाहत्यांचे आभार मानले असून सर्वांनी सुरक्षित रहावे, असाही सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांत इरफान पठाण, युसूफ पठाण व सुब्रमण्यम बद्रीनाथ हे तीन क्रिकेटपटूही कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. Sachin Tendulkar Admitted to Hospital for Corna
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख