रोहित पवारांनी मोदींना केली ही विनंती

रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करत केंद्र सरकारने जपानशी केलेला हा करार स्वागतार्ह पाऊल असल्याचे म्हटले आहे.
Nasendra Modi Rohit Pawar
Nasendra Modi Rohit Pawar

मुंबई : भारत आणि जपान यांच्यात झालेल्या कौशल्य हस्तांतरण कराराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा करत केंद्र सरकारने जपानशी केलेला हा करार स्वागतार्ह पाऊल असल्याचे म्हटले आहे. मात्र, या करारातून उपलब्ध होणाऱ्या संधीचा सर्व राज्यांना समान लाभ मिळावा, अशी विनंतीही रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे. 

या करारामुळे भारत आणि जपान यांच्यातील भागीदारी आणि सहकार्याला संस्थात्मक चौकट प्राप्त होणार आहे. त्यामुळे आवश्यक तंत्रज्ञान आणि जपानी भाषा अवगत असणाऱ्या भारतीय तरूणांना जपानमधील 14 विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. परिणामी भारतातील कुशल मनुष्यबळ जपानमध्ये पाठवणे सोपे होईल. मात्र, हे करताना देशातील प्रत्येक राज्यातील तरुणांना समान संधी मिळावी, अशी माझी तुमच्याकडे विनंती असल्याचे रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना टि्वटकरत म्हटले आहे. 

संस्थात्मक यंत्रणा उभारली जाणार 

आवश्यक तंत्रक्षान आणि जपानी भाषा येत असलेल्या तरुणांना जपानमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी भारत आणि जपान यांच्यात कौशल्य हस्तांतरण करार झाला आहे. या करारास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. सहकार्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभी केली जाणार आहे. या करारामुळे भारतीय कामगारांना जपान सरकार "विशिष्ट कुशल कामगार" म्हणून जपानमध्ये राहण्यासाठी नवीन दर्जा देणार आहे. 

या क्षेत्रातील कागारांना मिळणार संधी
 
नर्सिंग, बांधकाम, इमारत साफसफाई, साहित्य प्रक्रिया, औद्योगिक यंत्रणा उत्पादन, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक माहितीशी संबंधित उद्योग, जहाज बांधणी आणि जहाज संबंधित उद्योग, वाहन देखभाल, विमानचालन, शेती, मासेमारी, अन्न व पेय पदार्थ उत्पादन यांतील कुशल कामगारांना जपानमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

या कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशामध्ये संयुक्त कार्य गट स्थापन केला जाणार आहे. यामुळे कामगार व कुशल व्यावसायिकांची जपानमध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या वाढेल, असे, अधिकृत निवेदनात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com